Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Zilla Parishad Election 2026: दोन्ही ‘राजें’मध्ये ४५ मिनिटे खलबते! जागावाटप आणि रणनीतीवर सोनगाव बंगल्यावर चर्चा

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात सोनगाव येथे महत्त्वाची बैठक पार पडली. जागावाटप आणि समन्वयाबाबत ४५ मिनिटे चर्चा झाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 19, 2026 | 09:54 PM
दोन्ही 'राजें'मध्ये ४५ मिनिटे खलबते! जागावाटप आणि रणनीतीवर सोनगाव बंगल्यावर चर्चा (Photo Credit- X)

दोन्ही 'राजें'मध्ये ४५ मिनिटे खलबते! जागावाटप आणि रणनीतीवर सोनगाव बंगल्यावर चर्चा (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी
  • आमदार महेश शिंदे यांच्याशी सुद्धा उदयनराजे यांची चर्चा
सातारा : खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली. या बैठकीमध्ये प्रत्यक्ष जागावाटप आणि समन्वयक निर्णय याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीबाबत कोणत्याही सूत्रांनी दुजोरा दिला नाही. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे .

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि १३० गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी सातारा तालुक्यातील ८ गट आणि १६ गणासाठी वेगवेगळ्या गटातून आणि गणातून इच्छुकांचे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. सातारा शहरातील दोन समांतर सत्ता केंद्र असणाऱ्या जलमंदिर व सुरुची या दोन्ही बंगल्यांवर उत्साही कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण बैठक सोनगाव येथील बंगल्यावर झाली.

यावेळी लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर तसेच राजू भैय्या भोसले इत्यादी उपस्थित होते. गत पंचवार्षिक काळामध्ये सातारा तालुक्यामध्ये १० गट आणि २० गण होते. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सात गटावर तर उदयनराजे यांचे तीन गटांवर वर्चस्व होते तर सातारा पंचायत समितीमध्ये ११ जणांवर शिवेंद्रसिंहराजे यांचे तर नऊ गणावर उदयनराजे यांच्या समर्थकांचे वर्चस्व होते. मात्रगटाची आणि गणाची रचना बदलल्याने सातारा तालुक्यात ८ गट आणि १६ गट सध्या निर्देशित आहेत.

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

नागठाणे कोडोली पाटखळ आणि खेड हे चार गट राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून येथील निर्णय आणि येथील द्यावयाचा उमेदवार यावर राजकीय मतैक्य होणे महत्त्वाचे आहे. या उमेदवाराला उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे या दोघांचाही पाठिंबा असणे आवश्यक आहे. त्यासंदर्भाने दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती आहे मात्र या बैठकीत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही महाराजांची सुमारे ४५ मिनिटे कमरा बंद खलबते झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पाटखळ आणि कोडोली या दोन महत्त्वपूर्ण गटासाठी सुद्धा आमदार महेश शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली या दोन्ही गटांमध्ये सुद्धा महेश शिंदे यांच्यासह शिवेंद्रसिंह राजे व उदयनराजेयांचे प्रभावित कार्यक्षेत्र आहे त्यामुळे येथे सुद्धा समन्वयाने निर्णय व्हावा ही अपेक्षा आहे. त्या संदर्भाने महेश शिंदे यांनी उदयनराजे यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे.या प्रार्थमिक बैठकीत रणनीती काय ठरली अथवा काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

Web Title: Udayanraje and shivendrasinhraje meeting satara zp election seat sharing strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Satara
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Crime: साताऱ्यात अघोरी चोरी, घरफोडी करून जिम साहित्य चोरी; एवढेच नाही तर चोरांनी अघोरी चिन्हे सोडली,भीतीचे वातावरण
1

Satara Crime: साताऱ्यात अघोरी चोरी, घरफोडी करून जिम साहित्य चोरी; एवढेच नाही तर चोरांनी अघोरी चिन्हे सोडली,भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.