
Uddhav Thackeray Attacks On BJP:
Uddhav Thackeray Attacks On BJP: महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी संयुक्तपणे शनिवारी मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध “सत्याचा मोर्चा” (Satyacha Moorcha) आयोजित केला. या मोर्चाचा उद्देश मतदार यादीतील कथित अनियमितता आणि डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्याकडे सरकार आणि आयोगाचे लक्ष वेधले आहे.
चर्चगेट येथील एका रॅलीत बोलताना शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपला “अनाकोंडा” म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण आता अनाकोंडा थांबवला पाहिजे. अन्यथा, हे लोक सुधारणार नाहीत. पुरावे दररोज समोर येत आहेत. तरीही, सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग गप्प आहेत. त्यांनी आमचा पक्ष चोरला, आमचे नाव चोरले, आमचे निवडणूक चिन्ह चोरले. माझ्या वडिलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते थांबवले नाही, म्हणून आता ते मते चोरत आहेत.”
“दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा प्रयत्न करत आहेत. आणि तेही पुरेसे नाही म्हणून आता मत चोरायला लागले आहेत,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील वक्तव्यावर टीका करत ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले की लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात विरोधकांनी फायदा घेतला याचा पर्दाफाश करणार आहेत. मी त्यांना आव्हान देतो, करा पर्दाफाश! पण जेव्हा मुख्यमंत्रीच अशा प्रकारे बोलतात, तेव्हा याचा अर्थ त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की मतचोरी झाली आहे, आणि होत आहे.”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून मतदार यादीतील नावे हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे म्हणाले, “मतदार यादीतील नाव पडताळणीसाठी माझ्या नावाने ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. हा अर्ज २३ तारखेला ‘सक्षम’ नावाच्या अॅपवरून दाखल करण्यात आला. याचा अर्थ माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी मागवण्याचा आणि माहिती हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्यासकट कुटुंबातील चार जणांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा डाव रचला गेला असावा,” असा संशय ठाकरे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणात आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबला असून सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात तरी न्याय मिळतो की नाही, याची देखील ही एक परीक्षा असेल. निवडणूक आयुक्त लाचार झाले आहेत. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी खात्री आहे. पण अखेर जनतेचं न्यायालय मतचोरांचा निकाल लावेल,” असा इशाराही ठाकरे यांनी दिला.