Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती…; उद्धव ठाकरेंनी महायुतीचे वाभाडे काढले

ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 08, 2024 | 04:42 PM
Uddhav Thackeray: शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती…; उद्धव ठाकरेंनी महायुतीचे वाभाडे काढले
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा:   छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो दरोडेखोरांच्या नाही, अशी घणाघाती टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ आज (8 नोव्हेंबर) बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी बोलत होते. तसेच, मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्यासाठी माफी मागतो असं म्हणत त्यांनी माफीही मागितली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही सर्वांनी आपल्या जयश्रीताईंना आमदार करा, आपलं बहुमत आल्यावर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं असेल, जालिंदरसारखी माणसं हल्ली सापडत नाही. त्यांनी संपूर्ण तयारी केली होती. पण माझा आदेश ऐकला आणि तो थांबला. पण आता मी त्याची जबाबदारी घेतली आहे. मी फसवाफसवी करणार नाही. थोतांड बोलणार नाही. शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं होतं. इतर गोष्टी जातील आणि परत येतील. पण डोनाल्ड ट्रम्पही हरले होते पण परत निवडूनही आले. त्यामुळे आपण शब्द दिला की वाट्टेल ते झालं तरी शब्द खाली पडून द्यायचा नाही. यावेळची निवडणूक ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत.

हेही वाचा: Narendra Modi Dhule Speech: महाविकास आघाडी ही चालक आणि चाके नसलेली गाडी; धुळ्यातून मोदींनी तोफ डागली

आज जे छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते सगळेच शिवरायांचे मावळे नाहीत. गेल्यावेळी आपली चूक झाली. पण मी आज निवडणुकीच्या प्रचारात फिरून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात गद्दार उभा केला आहे. साहजिकच आहे ती चूक माझी आहे. कारण गेल्यावेळी मीच यांना विश्वास ठेवून तिकीट दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडून दिलं. पण आता ती चूक पुन्हा होणार नाही.

छत्रपती शिवरायांनी मावळे तयार केले होते. शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्याच हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली आणि आपल्या पक्षावर दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत. पन्नास खोके आता नॉट ओके. आता त्यांनी एवढं कमावलं आहे की आता त्यांना हरवलं तरी फरक पडत नाही. 50 खोके तर आता त्यांच्यासाठी सुट्टे पैसेच झाले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा:काँग्रेसचा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठींबा

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचींही मला कमाल वाटते, की तुम्ही चोर आणि दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येता. ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. पण तुम्ही हिंदुत्त्वाचा भ्रम निर्णण केला. वर गेल्यावर आम्हालाच लाथा घालू लागले, पण ठीक आहे, आता आम्हीही तुमचं तंगडं धरून तुम्हालाच महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले,

बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोकांना आणावे लागत आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विदर्भात येऊन गेले, बटेंगे तो कटेंगेंचा नारा देऊन गेले. कुणाची हिंमत आहे असं करण्याची, आम्हाला काय शिकवत आहात. असा खडा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आज महाराष्ट्रातले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार हे सगळे आमच्या पाठिशी उभे आहेत. पण तुमच्याच महायुतीतले गुलाबी जॅकेटवालेच म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्यात लुडबूड करू नये, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असाटोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा: NFLच्या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत; त्वरित अर्ज करा

Web Title: Uddhav thackeray buldhana speech uddhav thackeray criticizes shinde group yogi adityanath and mahayuti nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Shinde group
  • Uddhav Thackeray
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.