Pen : काँग्रेसचा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठींबा
पेण/ विजय मोकल :- राज्यात निवडणुकीच्या प्रचारसभांना वेग आला आहे. सर्व पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. त्यामुळे दर दिवसाला राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. तसंच राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. असं अशोक मोकल यांनी सांगितलं आहे.
पेण – सुधागड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अतjepkeल म्हात्रे यांचा सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून ते निवडून यावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पेण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावं. 191 पेण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांचेच काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा. असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांनी पत्रकार परिषदेत केले.पेण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. ही माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उमेदवार अतुल म्हात्रे, दिनेश म्हात्रे,आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-Maharashtra Elections 2024 : महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहा यांचे जाहीर सभेत संकेत
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पेण, अलिबाग आणि पनवेलची या तीन जागा आघाडीच्या माध्यमातून शेकापला दिल्या असल्याचे जाहीर केले होते. पेण विधानसभेत शेकापच्या अतुल म्हात्रे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर हे दोन्ही उमेदवार लढत असल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोनही घटक पक्षांच्या उमेवारांमध्ये काँग्रेस पक्षाने नक्की कोणाला पाठिंबा जाहीर करावा मोठा पेच निर्माण झाला. मात्र काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या आदेशानुसार हा संभ्रम दूर झाला आहे. यापुढे काँग्रेस पक्ष संपूर्ण विधानसभा मतदारसंघात अतुल म्हात्रे यांचेच काम करणार असल्याने म्हात्रे यांची ताकद वाढली आहे. काँग्रसने आज आम्हाला जाहीर पाठिंबा दिल्याने लोकांमधील अधिकृत उमेदवार कोण आहे हा संभ्रम दुर झाला. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आपण लढत आहोत. काँग्रेसने दिलेल्या पाठिंबामुळे अधिक ताकत वाढणार आहे. त्यामुळे विधानसभेत आपला विजय निश्चितच होणार असं उमेदवार अतुल म्हात्रे यांनी सांगितले.
sharad pawar, atul mhatre, pen Assembly,