Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 26, 2023 | 10:21 PM
uddhav thackerays rally in malegaon and chief minister eknath shinde family at raj thackeray house twist in maharashtra political discussion nrvb

uddhav thackerays rally in malegaon and chief minister eknath shinde family at raj thackeray house twist in maharashtra political discussion nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मालेगावमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यावर चर्चा होणार का?

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतील त्या ठिकाणी सभा घेत त्यांच्या मागे फिरू नका. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असेही राज ठाकरे म्हणाले होते त्यानंतर एकनाथ शिंदे आज सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहचले आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पहिली भेट नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि पाडवा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली होती. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत सात ते आठ वेळा भेट झाली आहे. गणपतीच्या निमित्तानेही यांची भेट झाली होती. तर कधी सदिच्छा भेट झाली होती.

घर पाहण्यासाठीही राज ठाकरेंच्या घरी याआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पोहचले होते. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सहकुटुंब स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आमंत्रण स्विकारले असून ते आता राज ठाकरेंच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण येणार आहे.

Web Title: Uddhav thackerays rally in malegaon and chief minister eknath shinde family at raj thackeray house twist in maharashtra political discussion nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2023 | 10:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malegaon
  • Uddhav Thackeray
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.