Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: उजनी धरणात विकासाची नवी क्रांती! फक्त ९ टक्के जलक्षेत्रावर सौर प्रकल्प, ४० हजार रोजगारांची अपेक्षा

Solapur Ujani Dam Development Project: उजनी धरण परिसरात २ हजार मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प, १८०० मेगावॅट बॅटरी स्टोरेज आणि १.४ गिगावॅट क्षमतेचे AI डेटा सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 30, 2026 | 09:54 PM
photo-social media

photo-social media

Follow Us
Follow Us:
  • उजनी प्रकल्पाबाबत मोठी अपडेट
  • सोलापूरला मिळणार विकासाची नवी दिशा
  • २८०० कायमस्वरूपी नोकऱ्या, ४० हजार रोजगारांचे लक्ष्य
सोलापूर : उजनी धरण परिसरातील प्रस्तावित फ्लोटिंग सोलार, बॅटरी स्टोरेज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डेटा सेंटर प्रकल्पामुळे सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रकल्पातून दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती, २८०० कायमस्वरूपी आणि सुमारे ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उजनीच्या एकूण जलक्षेत्रापैकी केवळ नऊ टक्के क्षेत्रावर सौर प्रकल्प उभारण्यात येणार असून, उर्वरित ९१ टक्के जलाशय खुला राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

प्रकल्पाबाबत पाणीवापर, शेतकऱ्यांचे नुकसान, विस्थापन, मासेमारी आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी विविध शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पाचे स्वरूप आणि नागरिकांच्या शंकांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्य शासनाने १६ एप्रिल २०२६ रोजी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे.प्रकल्पांतर्गत दोन हजार मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प, १८०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था आणि १.४ गिगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक डेटा सेंटर प्रस्तावित आहे. सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज डेटा सेंटरसाठी वापरली जाणार असून, अतिरिक्त वीज बॅटरीमध्ये साठवली जाणार आहे.

सहा टीएमसी नव्हे, वर्षाला ०.४२ टीएमसी पाणी

उजनीच्या ३३ हजार ६३० हेक्टर जलक्षेत्रापैकी तीन हजार हेक्टरवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी सहा टीएमसी पाणी लागणार असल्याची चर्चा चुकीची असून, प्रत्यक्षात वार्षिक ०.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. कमाल वापर ०.५ टीएमसीपर्यंत राहणार आहे. विद्यमान पाणीवाटप व्यवस्थेत कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डेटा सेंटरमध्ये पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी आधुनिक बंदिस्त शीतकरण तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसेच फ्लोटिंग सोलारमुळे बाष्पीभवन ३० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होऊन वर्षाला सुमारे १.५ टीएमसी पाण्याची बचत अपेक्षित आहे.

भीमानगरमधील ३११ कुटुंबांचा प्रश्न मार्गी

भीमानगरमधील नागरिकांचे विस्थापन होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जलसंपदा विभागाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या ३११ कुटुंबांसाठी ५१.१८ एकर क्षेत्र विनामोबदला उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भीमानगर-रांझणी, तरटगाव आणि हिंगणगाव येथील एकूण ४१५.७५ एकर शासकीय जमिनीचा वापर प्रस्तावित आहे. याव्यतिरिक्त खासगी जमिनीचे नव्याने संपादन केले जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

ग्रीन हायड्रोजन, अणुऊर्जा प्रकल्प नसणार

उजनी परिसरात ग्रीन हायड्रोजन किंवा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (अणुऊर्जा प्रकल्प) उभारण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प प्रस्तावित आराखड्यातून वगळण्यात आला आहे.

डेटा सेंटरमधून रसायनयुक्त सांडपाणी निर्माण होणार नसून, शीतकरणासाठी वापरण्यात येणारे द्रव बंद पाइप व्यवस्थेत राहणार आहे. कोणतेही सांडपाणी उजनी जलाशयात सोडले जाणार नाही. पाण्याची गुणवत्ता आणि पर्यावरणीय निकषांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. जलाशयाचा ९१ टक्के भाग खुला राहणार असल्याने मासेमारी आणि जलचरांच्या अधिवासासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध राहील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

उजनीच्या देखभालीसाठी वर्षाला १८० कोटी

या प्रकल्पातून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला दरवर्षी सुमारे १८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या निधीचा वापर उजनी प्रकल्प आणि पाणी वितरण व्यवस्थेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून स्थानिक पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे.

प्रकल्पामुळे २८०० कायमस्वरूपी आणि ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. स्थानिक अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प समन्वयक आणि भीमानगर, तरटगाव व हिंगणगाव येथील स्थानिक प्रतिनिधींची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

उजनी धरणाचे पाणी, शेती, मासेमारी आणि पर्यावरणाचे हित जपूनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. या प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्यक्त केला.

सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये! थकबाकीदारांच्या मालमत्ता सील, नळजोडण्यांवरही हातोडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: उजनी प्रकल्पात कोणते प्रमुख प्रकल्प उभारण्यात येणार आहेत?

    Ans: या प्रकल्पात २ हजार मेगावॅट फ्लोटिंग सोलार, १८०० मेगावॅट बॅटरी स्टोरेज आणि १.४ गिगावॅट क्षमतेचे AI डेटा सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे.

  • Que: उजनी सौर प्रकल्पासाठी किती पाणी लागणार?

    Ans: प्रकल्पासाठी वर्षाला सुमारे ०.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असेल. कमाल पाणीवापर ०.५ टीएमसीपर्यंत राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

  • Que: उजनी प्रकल्पामुळे किती रोजगार निर्माण होणार?

    Ans: या प्रकल्पामुळे सुमारे २८०० कायमस्वरूपी नोकऱ्या आणि ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Ujani dam solar project solapur 40000 jobs ai data center pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Solapur
  • Solar Project
  • Ujni

संबंधित बातम्या

सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये! थकबाकीदारांच्या मालमत्ता सील, नळजोडण्यांवरही हातोडा
1

सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये! थकबाकीदारांच्या मालमत्ता सील, नळजोडण्यांवरही हातोडा

Pune Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी
2

Pune Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी

Solapur News: मोहिते-पाटलांमुळे जिल्हा बँक अडचणीत! सचिन कल्याणशेट्टींचा घणाघात
3

Solapur News: मोहिते-पाटलांमुळे जिल्हा बँक अडचणीत! सचिन कल्याणशेट्टींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.