Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujedachya Vatevar Exhibition : उजेडाच्या वाटेवर ! महिलांचा संघर्ष,कर्तृत्व आणि स्वप्नांचा प्रवास उलगडणारे अनोखे छायाचित्र प्रदर्शन

Ujedachya Vatevar Exhibition : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 28, 2026 | 10:01 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची क्षमता  
  • समाजाला स्वतःच्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्याची संधी देते  
  • पारंपरिक प्रदर्शन नसून ‘वॉक-इन’ स्वरूपाचे प्रदर्शन  
Ujedachya Vatevar Exhibition : स्त्री म्हणजे केवळ घराचा आधार नव्हे, तर समाजाच्या जडणघडणीतील एक महत्वाची शक्ती आहे. तिच्या कष्टांची, स्वप्नांची, संघर्षाची आणि कर्तृत्वाची ओळख करून देणारे मंत्रालय येथील त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’या छायाचित्राचे प्रदर्शन स्त्रीजीवनाचे अनेक अनोखे पैलू पाहण्यास मिळतील.‘उजेडाच्या वाटेवर’ ही संकल्पना मुळातच प्रकाश देणारी वाट दाखवणारी दिसून येते. कधी स्वतः प्रकाश होऊन, तर कधी पावलापुरत्या उजेडात वाट शोधत पुढे जाणाऱ्या स्त्रियांच्या जगण्याचे वास्तव या प्रदर्शनातून प्रभावीपणे समोर येते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात राज्य महिला आयोगाने हे प्रदर्शन आयोजित केले होते.

या छायाचित्र प्रर्दशनात डोंबाऱ्याच्या खेळात कसरत करणाऱ्या चिमुरडीचे छायाचित्र मात्र मनाला अस्वस्थ करणारे आहे. ज्या वयात तिच्या हातात पुस्तक असावे, त्या वयात ती जगण्यासाठी दोरीवर तोल सांभाळत आहे. तिच्या कौशल्याचे कौतुक करतानाच तिच्या बालपणाचा, शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा विचार करायला हे छायाचित्र भाग पाडते. तिची जिद्द प्रेरणादायी असली, तरी प्रत्येक मुलीला धोक्याच्या दोरीवर नव्हे, तर सुरक्षित जमिनीवर उभे राहून स्वप्ने पाहता आली पाहिजेत.

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची क्षमता

‘अबला की सबला’ या विषयातून स्त्रीचे स्वातंत्र्य, जोडीदार निवडीचा अधिकार आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची क्षमता दिसते. ‘सहजीवन’ या छायाचित्रांतून वयाच्या पलीकडे टिकून राहणारे प्रेम, आपुलकी आणि नात्यांमधील गोडवा अनुभवायला मिळतो. तर ‘जगण्यासाठी गुंफण’ या छायाचित्रातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या सामूहिक सहभागाचे, परस्परविश्वासाचे आणि एकजुटीचे दर्शन घडते.

‘महिलांची सुरक्षितता’ आणि ‘ ‘सन्मान’ हाही या प्रदर्शनाचा महत्वाचा भाग आहे. ‘शी बॉक्स’ या विषयातून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध तक्रार करण्याच्या व्यवस्थेचे महत्व ठळकपणे दिसते. ‘आता रडायचे नाही, आता थांबायचे नाही’ हा संदेश महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा मिळते. महिलांच्या तक्रारींची दखल घेणे, समुपदेशन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे यांद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांना न्याय मिळविण्यासाठी सहाय्य करते.

आयोगाच्या अधिकारांविषयी आणि कायदेशीर तरतुदींविषयी जनजागृती करण्याचे महत्वही यातून स्पष्ट होते. ‘पंढरीच्या वाटेवर’ या छायाचित्रातून महिला वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी आवश्यक सुविधांची जाणीव होते. स्वच्छतागृहे, न्हाणीघरे आणि दामिनी पथकाची मदत यासारख्या उपाययोजना स्त्रियांच्या प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी निगडित आहेत. श्रद्धेच्या प्रवासातही महिलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होता कामा नये, हा या विषयाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.

Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा महाजाम! १५ ते २० किमीपर्यंत रांगा; प्रवाशांचे हाल

समाजाला स्वतःच्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्याची संधी देते

‘उजेडाच्या वाटेवर’ हे प्रदर्शन केवळ स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी सांगत नाही, तर समाजाला स्वतःच्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्याची संधी देते. स्त्रीच्या श्रमांना मान्यता, तिच्या क्षमतेवर विश्वास, तिच्या निर्णयांचा आदर आणि तिच्या हक्कांची जपणूक या गोष्टी समानतेच्या समाजासाठी आवश्यक आहेत.

स्त्रीच्या वाटेतील अडथळे दूर करणे महत्वाचे आहे. तिच्या कर्तृत्वाला मान्यता देणारे आणि तिच्या स्वप्नांना समान संधी देणारे वातावरण निर्माण झाले, तर तिचा प्रवास अधिक सक्षम होईल. स्त्रीच्या आयुष्याचे अनेक पदर संवेदनशीलतेने उलगडणारे हे प्रदर्शन म्हणूनच केवळ पाहण्याचा अनुभव नसून, विचार करण्याची आणि समाजातील बदलाची सुरुवात करण्याची प्रेरणा आहे.

या छायाचित्र प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छायाचित्रासोबत गुंफलेल्या कवी आणि कवयित्रींच्या कविता. छायाचित्रे आणि कवितांचा हा सुंदर संगम प्रदर्शनाला अधिक जिवंत, संवेदनशील आणि आशयपूर्ण बनवतो. या प्रदर्शनात प्रज्ञा दया पवार, सुमती लांडे, कल्पना दुधाळ, संजीवनी बोकील, अजय कांडर आणि प्रकाश होळकर यांच्यासह संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, नारायण सुर्वे आणि अरुण काळे यांच्या कवितांचा समावेश आहे.

पारंपरिक प्रदर्शन नसून ‘वॉक-इन’ स्वरूपाचे प्रदर्शन

प्रदर्शनाच्या निर्मितीत संकल्पना व छायाचित्रे- संदेश भंडारे, शब्दांकन वर्षा कुलकर्णी, इंग्रजी अनुवाद उदय ओक, कविता निवड अजय कांडर, प्रदर्शन रचना ,सिद्धार्थ सहाय्य , जितेंद्र कळसकर सुंदरलेखन : प्रभाकर भोसले आणि किशोरी गद्रे यांनी केले आहे. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्रिमूर्ती प्रांगणात आहे.

या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे हे पारंपरिक प्रदर्शन नसून ‘वॉक-इन’ स्वरूपाचे प्रदर्शन आहे. सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटले की भिंतींवर लावलेली चित्रे किंवा छायाचित्रे पाहणे, अशी संकल्पना आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, या प्रदर्शनात प्रेक्षकांना प्रत्यक्ष प्रवेश करून प्रदर्शनाचा अनुभव घेता येतो. त्यामध्ये प्रेक्षकांनी अनुभव घेणे हे उद्दिष्ट असते ते येथे साध्य झाले असल्याचे दिसत आहे असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी सांगितले.

BMC Employees Diwali Bonus : दिवाळीपूर्वी बंपर गिफ्ट! BMC कर्मचाऱ्यांना तब्बल 33000 रुपयांच्या बोनसची घोषणा; कधी जमा होणार पैसे?

Web Title: Ujedachya vatevar women empowerment photo exhibition mumbai sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • AadityaThackeray
  • Government of Maharashtra
  • Mantralaya
  • NCP News

संबंधित बातम्या

अधिस्वीकृत संपादक अन् पत्रकार महासभेच्या राज्याध्यक्षपदी निलेश भिलारे; सचिवपदी अशोक इथापे
1

अधिस्वीकृत संपादक अन् पत्रकार महासभेच्या राज्याध्यक्षपदी निलेश भिलारे; सचिवपदी अशोक इथापे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.