Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Umaraga Panchayat Election: उमरग्यात महायुतीतच कुरघोडी; सभापतीपदावरून मित्रपक्ष आमनेसामने

उमरगा पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवूनही उमरग्यात मित्र पक्षांमध्येच सभापतीपदावरून चुरस निर्माण झाली आहे. धनुष्यबाणाने कमळाला घायाळ केल्याची चर्चा रंगत असून सत्ता संपादनाच्या वारूला अडथळ्यांची शर्यत लागली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 23, 2026 | 06:22 PM
यंदाच्या वर्षी नागपुरात जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीच; जुलैमधील सुनावणीनंतरच होणार निर्णय

यंदाच्या वर्षी नागपुरात जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीच; जुलैमधील सुनावणीनंतरच होणार निर्णय

Follow Us
Follow Us:
  • उमरग्यात सभापतीपदासाठी राजकीय शर्यत
  • संख्याबळ असूनही सत्ता अडखळली
  • आकांक्षा चौगुले यांचा सभापतीपदावर दावा
 

Umaraga Panchayat Election: उमरगा पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवूनही उमरग्यात मित्र पक्षांमध्येच सभापतीपदावरून चुरस निर्माण झाली आहे. धनुष्यबाणाने कमळाला घायाळ केल्याची चर्चा रंगत असून सत्ता संपादनाच्या वारूला अडथळ्यांची शर्यत लागली आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर नसल्याने भाजपचे सात नवनिर्वाचित सदस्य गोवा दर्शनासाठी गेले असून राजकीय हालचालींना वेगळे वळण मिळाले आहे.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

उमरग्यात महायुतीतच कुरघोडी सुरू झाल्या आहेत. सभापतीपदावरून मित्रपक्ष आमनेसामने आले आहेत. उमरगा तालुक्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भारतीय जनता पार्टीला सात, शिवसेनाला पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ असले तरी शिवसेनेच्या केसरजवळगा गणातून विजयी झालेल्या आकांक्षा चौगुले यांनी सभापतीपदावर दावा केल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. बसवराज पाटलांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माजी आ. ज्ञानराज चौगुले यांची कन्या म्हणून त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत युती करून सत्ता स्थापनेचा त्यांचा अनुभव लक्षात घेतला जात आहे. भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे नाव चर्चेत असताना शिवसेनेच्या पाच जागा निर्णायक ठरत आहेत. वरकरणी सोपी वाटणारी सत्ता स्थापनेची गणिते आता क्लिष्ट बनली आहेत. आकांक्षा चौगुले यांनी महायुतीच्या निर्णयाला मान्य राहण्याची भूमिका घेत शांतपणे डावपेच रचले आहेत.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

भाजपचे नेते माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरली आहे. काही पारंपरिक मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कैलास शिंदे यांना सभापती करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी बदलत्या राजकीय घडामोडींमुळे ही वाट खडतर बनली आहे. सभापतीपदाचा फैसला जाहीर होईपर्यंत उमरग्यातील राजकीय वातावरण तापलेलेच राहणार असल्याचे चित्र आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Umarga mahayuti in turmoil allies face off over chairmanship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Latur

संबंधित बातम्या

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
1

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.