• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Latur Zp Panchayat Samiti Elections 2026 Mahayuti Vs Mva In High Voltage Battle

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 03, 2026 | 03:32 PM
Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर जिल्ह्यात महायुती-महाविकास आघाडीत चुरस
  • मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारही रिंगणात
  • केंद्र-राज्याच्या विविध योजनांवर भाजपाचा भर
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळत असून प्रचाराच्या मैदानात आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन सुरू झाले आहे. प्रत्येक पक्षाचा नेता आपलाच पक्ष जनतेसाठी अधिक प्रामाणिक, विकासाभिमुख आणि विश्वासार्ह असल्याचा दावा करत आहे. महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते गावोगावी सभा, प्रभागनिहाय बैठका, पदयात्रा, कोपरा सभा यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत आहेत.

सत्ताधारी पक्ष विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहे, तर विरोधक अपूर्ण कामे, रखडलेली आश्वासने आणि जनतेच्या अपेक्षांवर झालेली कुचराई यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘आम्ही काय केले’ आणि ‘त्यांनी काय केले नाही’ या मुक्ष्यांभोवतीच प्रचाराची दिशा फिरताना दिसत आहे. या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे ५३, भाजपाचे ५०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ९, शिंदे गट शिवसेना ३१ तर उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Latur ZP Election 2026: काँग्रेस उमेदवाराचे ‘अपहरण’ की राजकीय खेळी? २० गाड्यांच्या ताफ्यासह माघार, काँग्रेसला धक्का

जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याच पक्षाकडे यावे यासाठी दोन्ही आघाड्यांचे नेते रणनीती आखून कामाला लागले आहेत. कुठे थेट विकासाचा मुद्दा, कुठे भावनिक साद, तर कुठे स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत विकासाचीच आश्वासने दिल्ली जातात, प्रत्यक्षात मात्र त्यांची पूर्तता होताना दिसत नाही, अशी भावना अनेक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या निवडणुकीत मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देणार, महायुती आपली सत्ता कायम राखणार की महाविकास आघाडी नवे समीकरण घडवणार, याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणारा ठरणार असल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी तब्बल २४२ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही अपक्ष उमेदवार प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडत असल्याचे चित्र असून अपक्षांचा कौल निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर

ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असताना काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर भर देत त्यानी जनतेशी थेट संवाद साधला आहे. काँग्रेसने राबवलेल्या विकासकामांची माहिती देत विरोधकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली असून मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. तर, भाजपाचे आ. संभाली पाटील-निलंगेकर यांनीही प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आहे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकहिताच्या योजना, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि विकासकामांचा दाखला देत ‘विकास, स्वैर्य आणि विश्वास’ या मुद्दावर भाजपा ठाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदारानी पुन्हा विकासालाच संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी सभांमधून केले आहे.

Web Title: Latur zp panchayat samiti elections 2026 mahayuti vs mva in high voltage battle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Latur
  • Latur Politics
  • Mahayuti
  • Panchayat Samiti Election
  • shivsena
  • Zilla Parishad
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी
1

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी
2

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Shashi Tharoor upset : काँग्रेस पक्षामध्ये सर्वकाही सुरु आहे का आलबेल? शशी थरुर यांचा दावा पास की फेल?
3

Shashi Tharoor upset : काँग्रेस पक्षामध्ये सर्वकाही सुरु आहे का आलबेल? शशी थरुर यांचा दावा पास की फेल?

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 
4

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Feb 03, 2026 | 05:55 PM
“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

Feb 03, 2026 | 05:54 PM
ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Feb 03, 2026 | 05:53 PM
ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

Feb 03, 2026 | 05:53 PM
India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

Feb 03, 2026 | 05:51 PM
‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

Feb 03, 2026 | 05:50 PM
‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

Feb 03, 2026 | 05:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.