Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंब्रजला दुपारपर्यंत कडकडीत बंद, जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, भरपावसात आरपीआय कार्यकर्त्यांची निषेध फेरी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ उंब्रजमध्ये RPI (आठवले)च्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भरपावसात कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढून घोषणाबाजी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 06:26 PM
भर पावसात आरपीआय कार्यकर्त्यांची निषेध फेरी काढुन जोरदार घोषणाबाजी केली

भर पावसात आरपीआय कार्यकर्त्यांची निषेध फेरी काढुन जोरदार घोषणाबाजी केली

Follow Us
Follow Us:

उंब्रज / प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कराड उत्तर तालुका आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला गुरुवारी (दि. २३) उंब्रजमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानांनी स्वयंस्फूर्तीने शटर बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दुपारनंतर मात्र काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पुर्वरत सुरू केली.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभर विविध ठिकाणी आंदोलने होत असून त्याचे पडसाद उंब्रजमध्येही उमटले.

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…

या बंदबाबत आरपीआय (आठवले)च्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उंब्रज पोलीस ठाण्यात निवेदन देवून आंदोलनाची माहिती दिली होती. तसेच व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सकाळपासूनच उंब्रजमधील बहुतांश दुकाने बंद राहिली.

दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू असतानाही आरपीआय कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन उंब्रज शहरातून निषेध फेरी काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाचा निषेध नोंदविण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहिल्याने ही निषेध फेरी नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Web Title: Umbraj bandh rpi protest jantar mantar student lathicharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • CJP Protest
  • neet paper leak
  • Umbraj

संबंधित बातम्या

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
1

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
3

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.