Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका...
वर्धा, ब्युरो : सतत सुरू असलेल्या पावसाची पर्वा न करता वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केले. यावेळी नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, विद्यार्थी तरुणांवरील कथित अमानुष लाठीचार्ज तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आंदोलकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांना सादर केले.
Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा
जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संततधार पावसाची तमा न बाळगता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा परिसरात ठिय्या दिला. शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या कथित अनागोंदीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिवाय पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
आंदोलनात अभ्युदय मेघे, अरुणा धोटे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, बाळाभाऊ माऊस्कर, सागर सबाने, नीलेश तिजारे, रवींद्र भुजाडे, सुनील तळवेकर, बाबाराव पाटील, सुर्जित चौधरी, सोनाली कोपूलवार, ऋतुजा भोयर, मनोज देशमुख, चंद्रशेखर घोडे, विलास कोरले, श्रीकांत बाराहाते आदी सहभागी झाले होते.
Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी






