Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

उंब्रज रेस्ट हाऊसशेजारील कचरा डेपो आणि विषारी धुरावरून मनसे आक्रमक! प्रशासनाला निवेदन देऊन कचरा हटवण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 09:27 PM
Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक

Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक
  • तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
  • वाचा सविस्तर बातमी!
उंब्रज: उंब्रज येथील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) शेजारील मोरया गणेश मंडळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून घनकचरा टाकून तो उघड्यावर जाळला जात असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी तहसीलदार, कराड तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लोकवस्तीच्या मागील बाजूस तसेच राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही मीटर अंतरावर गावातील संपूर्ण घनकचरा टाकला जात असून तो दररोज जाळला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर परिसरातील घरांमध्ये शिरत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दम्याच्या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व त्वचारोगांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय सदर कचरा डेपो राष्ट्रीय महामार्ग आणि नदीसारख्या स्थानिक जलस्रोतांच्या अत्यंत जवळ असल्याने पर्यावरण व पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

मनसेने प्रशासनाकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकवस्तीपासून दूर पर्यावरणपूरक जागा तातडीने निश्चित करावी, सध्याचा कचरा त्वरित हटवून जागेचे निर्जंतुकीकरण करावे, भविष्यात त्या ठिकाणी कचरा टाकणे व जाळण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य विभागामार्फत हवा व पाण्याची तपासणी करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या निवेदनावर मनसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे, कराड तालुका अध्यक्ष रणजीत कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी यांच्यासह संदीप राठोड, विक्रम भंडारे, संतोष किरतकर्वे, प्रविण चव्हाण, आशिष धावारे, अशोक गाडे, विजय पवार, सुमित चव्हाण, शंभू रोकडे तसेच परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मनसेने इशारा दिला असून, प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक

Web Title: Umbraj rest house garbage depot controversy mns protest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Karad
  • MNS
  • Satara
  • Satara News
  • Umbraj

संबंधित बातम्या

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
1

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
2

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
3

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
4

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.