Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. डिजिटल मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करत १५ ऑगस्टनंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 08:48 PM
Umbraj Smart Meter protest

Umbraj Smart Meter protest

Follow Us
Follow Us:

उंब्रज : उंब्रज परिसरात स्मार्ट मीटरविरोधातील जनक्षोभ दिवसेंदिवस तीव्र होत असून, वाढीव वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उंब्रज येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट मीटर हटाव, ग्राहकांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक महावितरण कार्यालयात दाखल झाले.यावेळी कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले, उपतालुकाप्रमुख जीवन गायकवाड, संदीप थोरात, संदीप सपकाळ, रामराव घाडगे, योगेश गुजले, शंकरराव घार्गे, शशिकांत पवार, पांडुरंग सावंत, लक्ष्मण गोंजारे, श्रीमंत चव्हाण, लक्ष्मण नाईक, प्रभाकर कमाने, अविराज देशमुख, राजेश शिंदे, महादेव भोंगाळे, सचिन कांबळे, विक्रम अर्जूकडे यांच्यासह शिवसैनिक व मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक

उंब्रज महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अनंत लाड यांना निवेदन देऊन बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून पूर्वीचे डिजिटल मीटर बसविण्याची मागणी करण्यात आली.१५ ऑगस्टपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.

निवेदनात म्हटले आहे की, उंब्रज महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वाढली आहेत. तसेच वाढीव बिलामुळे ग्राहकांनी भरलेली अतिरिक्त रक्कम नियमानुसार परत करावी आणि स्मार्ट मीटर हटवून पुन्हा डिजिटल मीटर बसविण्याचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. शिवसैनिकांनी स्मार्ट मीटर धोरणाचा निषेध करत अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. तसेच उंब्रज परिसरात नव्याने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्या ठिकाणी पूर्वीचे डिजिटल मीटर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.

Satara Politics: जिल्हा बँक निवडणुकीत शेवटच्या ठरावाकडे लक्ष; हातगेघर सोसायटी ठरणार निर्णायक

Web Title: Umbraj smart meter protest mahavitaran karad satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • smart meter
  • Umbraj

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.