Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे २०५ कोटी ८९ लाख ९२ हजार रुपयांचे मूळ व पुरवणी अंदाजपत्रक सभागृहासमोर सादर केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2026 | 07:51 AM
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी प्रचंड गदारोळात पार पडली. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे हस्तांतरण, खटाव तालुक्यातील येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या कामातील कथित अनियमितता, अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि पुरवणी अंदाजपत्रक अशा अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काही विषयांवर मतदानाची मागणी, सभागृहात फलक झळकवून निषेध आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप यामुळे सभागृहातील वातावरण दीर्घकाळ तापले होते.

अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपाध्यक्ष राजू भोसले, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. मात्र, अनेक विभागांचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

सभेतील सर्वाधिक वादग्रस्त विषय ठरला तो सातारा शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालयाची जागा सातारा पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा. सदस्य राजू शेळके यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत, “जिल्हा परिषदेच्या मौल्यवान जागा नेमक्या कोणाच्या हितासाठी दिल्या जात आहेत?” असा सवाल उपस्थित केला. यापूर्वी हस्तांतरित झालेल्या जागांचे लेखापरीक्षण करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उपाध्यक्ष राजू भोसले यांनी संबंधित जागा शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट केले. मात्र, विरोधकांनी त्यावर समाधान न मानता मतदानाची मागणी केली.

दरम्यान, या चर्चेत संदीप मांडवे, सह्याद्री कदम, विक्रम शिंगाडे, वसंतराव मानकुमरे आणि गिरीश बनकर यांनीही सहभाग घेत जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचा विकास करून उत्पन्न वाढवण्याची भूमिका मांडली.

दोषींवर कारवाई केली जाईल

खटाव तालुक्यातील येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या कामावरूनही सभागृह चांगलेच तापले. सदस्या मनीषा फडतरे यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न करताच बंधाऱ्याचे ५० टक्के काम झाल्याचा आरोप केला. सर्व पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवून एका ठेकेदारालाच लाभ दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सभागृहात फलक झळकवत निषेध नोंदविला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी दिले.

प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न

याशिवाय आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीबाबत काढण्यात आलेल्या निविदेवरूनही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

नवी इमारत उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा

माजी अध्यक्ष उदय कबुले यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी अधिक निधीची गरज अधोरेखित केली. दिलीप बाबर यांनी प्रतापसिंह शेती फार्मसह जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे संरक्षण व विकास करण्याची मागणी करत, प्रांत व तहसील कार्यालयासाठी झेडपीची जागा कशी हस्तांतरित झाली, याची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेची जुनी इमारत पाडून नवी उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. मात्र, राजू शेळके यांनी विद्यमान इमारतीला हात लावल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला.

सर्वसाधारण सभा विशेष गाजली

शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे २०५ कोटी ८९ लाख ९२ हजार रुपयांचे मूळ व पुरवणी अंदाजपत्रक सभागृहासमोर सादर केले. गदारोळाच्या वातावरणातही अखेर अंदाजपत्रकासह अनेक विषय मंजूर करण्यात आले. सभागृहातील वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाला धारेवर धरण्याच्या घटनांमुळे ही सर्वसाधारण सभा विशेष गाजली.

वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन

Web Title: Uproar in the general meeting of satara zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
3

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.