Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uran News : उरण-पिरवाडी समुद्रात अडकले चार तरुण; सागर रक्षक दलाचे जीवघेणे बचावकार्य

नागाव-पिरवाडी किनारपट्टीजवळील समुद्राच्या मध्यभागी चार तरुण भरतीच्या पाण्यात अडकले. समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरती सुरू झाल्याने परत येणे अशक्य झाले होते. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2025 | 11:52 AM
उरण-पिरवाडी समुद्रात अडकले चार तरुण; सागर रक्षक दलाचे जीवघेणे बचावकार्य

उरण-पिरवाडी समुद्रात अडकले चार तरुण; सागर रक्षक दलाचे जीवघेणे बचावकार्य

Follow Us
Close
Follow Us:

उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. उन्हाच्या झळापासून थोडाफार दिलासा मिळवण्यासाठी समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत. पिरवाडी हा तसा छोटासा किनारा असला तरी त्याचे सौंदर्य, शांतता आणि येथे असलेल्या प्राचीन दर्ग्यामुळे या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची व भाविकांची रेलचेल सुरु असते. विशेषतः शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पिरवाडी किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचदरम्यान या आनंदमयी वातावरणात एक थरारक घटना घडली.

Ladki Bahin Yojna लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; आता ‘या’ महिलांचेही अर्ज बाद होणार…

नागाव-पिरवाडी किनारपट्टीजवळील समुद्राच्या मध्यभागी चार तरुण भरतीच्या पाण्यात अडकले. समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरती सुरू झाल्याने परत येणे अशक्य झाले. पाण्याचा वेग आणि खडकाळ रचना यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या भागात पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशीसारख्या दिवशी समुद्राची भरती अधिक तीव्र असते. परिणामी असे प्रकार याआधीही घडले आहेत.

सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वेळेत सागर रक्षक दलाला माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सागर रक्षक दलाने तत्काळ बोट घेऊन समुद्रात प्रवेश केला. त्यावेळी समुद्रात उधाण होते, लाटा जोरात धडकत होत्या आणि संपूर्ण परिसर खडकाळ असल्यामुळे मदतकार्य करणे अत्यंत धोकादायक होते. पण दलातील पवार आणि मिसाळ या अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला दलाचे सदस्य योगेश काठे, नौशाद कुरेशी, संतोष कडू आणि अकबर कुरेशी यांनीही तत्परता दाखवली. या सर्वांनी समन्वयाने काम करत समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या चार तरुणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

बचावलेल्या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे, शैलेश काटे (वय २२), सुमेध मिश्रा (वय २४), सागर नावणे (वय २४) आणि सुमेध अवस्कर (वय २२). हे सर्वजण ऐरोली, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. सागर रक्षक दलाच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि चार तरुणांचे प्राण वाचले. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि सागर रक्षक दलाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शनाशिवाय खोल समुद्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Phule Movie Controversy : “एकही सीन कट होता कामा नये…; ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Web Title: Uran news four youths trapped in uran pirwadi sea the sea guards deadly rescue operations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.