Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात

वसमत शहराची स्थिती विकासाच्या नावाखालील आर्थिक लुटीचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक म्हणत आहेत. प्रत्यक्षात शहराचा "विकास" हा फक्त कागदावर आणि कंत्राटदारांच्या आर्थिक वाढीत दिसून येतो.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 27, 2025 | 06:52 PM
urvey was conducted in Vasmat and it was revealed that there are many problems nanded news

urvey was conducted in Vasmat and it was revealed that there are many problems nanded news

Follow Us
Close
Follow Us:

वसमत : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसमत शहरात विकासाचे फुगवलेले दावे धुळीस मिळत आहेत. नवराष्ट्रच्या विशेष तपासातून समोर आलेली तथ्ये गंभीर आहेत. लोकप्रतिनिधींच्या भाषणात विकासाचा हल्ला असला, तरी प्रत्यक्षात शहराचा “विकास” हा फक्त कागदावर आणि कंत्राटदारांच्या आर्थिक वाढीत दिसून येतो. वसमत शहराची स्थिती विकासाच्या नावाखालील आर्थिक लुटीचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

नगरपालिकेने मागील तीन वर्षांत रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर केली. कंत्राटे दिली गेली. बिलंही पास झाली. पण शहरात आज अशी एकही मुख्य गल्ली नाही जिथे खड्ड्याशिवाय रस्ता दिसतो. एक नागरिक म्हणतो “रस्ते बनले की खड्डे भरायला, की खड्डे बनले रस्त्याला ? समजेनासे झाले आहे.” असे वसमतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे. ज्या शहरात विकास झाला नाही, त्या शहरात विकासाची भाषा ही नागरिकांचा अपमान आहे. निवडणूक काही दिवसांवर आली असली, तरी शहर आजही प्रश्नांनी वेढलेले आहे आणि उत्तर देणारा कोणी नाही.

नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार

शहर अंधारात आणि पाण्यावाचून पाणीपुरवठा

पाणीपुरवठाः कोटीची पाइपलाइन, पण नळातून ‘हवा’ पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या नव्या पाइपलाइनची किमत कोट्यवधींमध्ये, पण तांत्रिक क्षमतेचा पूर्ण अभाव. तपासात दिसून आले की ज्या भागात पाइपलाइन टाकली गेली, तिथल्या बहुतांश वाल्व्ह कार्यरतच नाहीत. पाणी पुरवठ्याची कोणतीही मॉनिटरींग प्रणाली नाही. ८-८ दिवस नळ कोरडे आणि तरीही कंत्राटदारांचे बिल १०० टक्के पास एका महिला रहिवाशाचे वक्त्तव्यः “नळावर येणा-या पाण्यापेक्षा राजकारण्यांच्या भाषणातला पाण्याचा आवाज जास्त.”

अंधारः लाईटसाठी कोट्यवधी, तरीही वसमत काळोखात प्रकाश योजनेसाठी कोटींचे प्रकल्प मंजूर. पण प्रत्यक्षात शहरातील ४०- ५० टक्के रस्त्यांवर स्ट्रीटलाइट कार्यरत नाहीत. काही भागात पोल बसवले, पण कनेक्शनच नाही. काहींमध्ये खांब उभे, पण दिवे गायब आहे. स्थानिक तरुणाचा टोला लाईटपेक्षा बिलिंगची व्यवस्था जास्त स्मार्ट आहे इथे असा टोला लगावला आहे.

बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड

स्वच्छता: दरमहा ३५ लाखांचा खर्च तरीही वसमत कचरा डेपो नगरपालिकेच्या कागदांनुसार स्वच्छतेसाठी दरमहा तब्बल ४० लाख रुपये खर्च केले जातात. पण प्रत्यक्षात तपासात आढळले घंटागाडी वेळेवर फिरतच नाही. उचललेला कचरा डंप करण्याची व्यवस्थित जागा नाही.

सर्वेक्षण
आमच्या सर्वेक्षणात ७३ टक्के नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले “या नगरपालिकेने विकास केला नाही, तर विकासाच्या पैशाचा विनियोग केला. पक्षीय सभांमध्ये विकासाच्या घोषणा धडाक्यात, पण नागरिकांचे प्रश्न थेट रस्ते कुठे गेले?, पाणी कुठे गेले?, लाईट कुठे गेले?, आणि कोट्यवधी रुपये कुठे गेले नागरिकांचा थेट इशारा ‘विकास’ हा मुद्दा बोलायलाच नकोच.

 

Web Title: Urvey was conducted in vasmat and it was revealed that there are many problems nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • daily news
  • Maharashtra Local Body Election
  • nanded news

संबंधित बातम्या

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!
1

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
2

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”
3

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण
4

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.