Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

वैभव खेडेकर यांची मनसे पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केल्यांनतर खेडेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2025 | 05:31 PM
राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण...; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण...; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

Follow Us
Follow Us:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांसुरु होत्या. अखेर मनसेने अधिकृत निर्णय घेत, खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांचीही मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी केल्यांनतर खेडेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

वैभव खेडेकर म्हणाले की, सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख वाटले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. अनेक आंदोलने, जेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग राहिला आहे. कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली आहेत. खेड नगर परिषदेत माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे सत्ता होती. मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो. पक्ष म्हणून कोकणात आघात झाले तेव्हा मी लोकांसोबत राहिलो. कोरोनामध्येही मी लोकांच्या सोबत होतो. पक्ष रुजावा ही माझी भूमिका होती.

मी भाजपच्या काही लोकांना भेटलो. म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो. विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, मला अद्याप भेट मिळालेली नाही, असे ही वैभव खेडेकर म्हणाले.

संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव आहे. हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असतं तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. मी पक्षाची शिस्त बिघडेल, असे काम कधीच केले नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली, असे म्हणत वैभव खेडेकर पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, राज ठाकरे साहेब आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल. तीस वर्ष पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला आहे. आजचं पत्र पाहून धक्का बसला की असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. आता पुढील निर्णय घ्यावा लागेल. मी अजून निर्णय घेतलेला नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वैभव खेडेकर कोण आहेत?

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते राज ठाकरेंबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. कोकणातील तरुण वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. खेड आणि दापोली परिसरा वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वैभव खेडेकर हे त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जातात.

Web Title: Vaibhav khedekar was seen getting emotional after being expelled from mns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • MNS Chief Raj Thackeray

संबंधित बातम्या

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
1

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
2

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड
3

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.