Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Palghar Breaking: पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. पालघर जिल्ह्यात एका रेल्वेच्या इंजिनला भीषण आग लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2025 | 09:58 PM
Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे इंजिनला भीषण आग 
पालघरमधील घटना 
वलसाड एक्स्प्रेसमधील घटना  

Railway Engine Fire News: पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. पालघर जिल्ह्यात एका रेल्वेच्या इंजिनला भीषण आग लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील केळवे रेल्वेस्थानकाजवळ इजिनला आग लागली आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आठ वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबवरून गुजरातला जाणाऱ्या वलसाड पॅसेंजरच्या इंजिनला आग लागली आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच रेल्वे केळवे स्थानकावर थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. तसेच पालघर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला पालघरमधील केळवे रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी भीषण आग लागली. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या या गाडीच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना साधारण आठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायर बंद केली असून त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर विलंबाचा सामना करावा लागत आहे.

आगीची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान व रेल्वे कर्मचारी मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष दक्षता घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाचे प्रवेशद्वारावर असलेले जगदीश कराळे यांच्या घराला पहाटे भीषण आग लागली होती.पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही आग लागली आणि त्यावेळी जगदीश कराळे यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती नव्हते. राहत्या घराला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र ही आग विझवण्यासाठी आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.परंतु ही आग इतकी भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तसेच या आगीच्या ज्वालांमध्ये घराचे पत्रे देखील फुटले आहेत.

 

Web Title: Valsad express engine fire breaks out mumbai to gujarat palghar breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • Fire News
  • Indian Railway
  • palghar fire

संबंधित बातम्या

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
1

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.