Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यभर राबविले जाणार विविध उपक्रम, तुम्हीही होऊ शकता या उपक्रमात सहभागी

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस  15 ऑक्टोबर हा राज्य  शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यभर विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. विशेष म्हणजे तुम्हीही या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.

  • By नारायण परब
Updated On: Oct 08, 2024 | 07:46 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस  15 ऑक्टोबर हा राज्य  शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने  ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार असून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे  डॉ.सदानंद मोरे असून या कार्यक्रमात  डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे.  दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर), पाचवा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसर, सयानी मार्ग, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

हे देखील वाचा- रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा पाश्चिमात्य आणि भारतीय ज्ञान परंपरांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचे हे सर्व दुर्लभ वाङ्मय एकत्रित स्वरुपात 18 खंडांमध्ये प्रकाशित केले आहेत.

हे देखील वाचा- सहावी माळ: काळभैरवाची सहचारिणी त्रिनेत्री श्री काळी जोगेश्वरी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विद्यापीठे, साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कथांचे अभिवाचनʼ हा कार्यक्रम, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्याभिवाचनʼ हा कार्यक्रम, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याख्यान व अभिवाचनʼ हा कार्यक्रम, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी, जि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याखान, परिसंवाद व ग्रंथप्रदर्शनʼ हा कार्यक्रम, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवलेखक कथालेखन कार्यशाळा असे विविध कार्यक्रम शैक्षणिक संस्थाद्वारे आयोजित केले गेले आहेत.

Web Title: Various activities will be conducted across the state on the occasion of vachan perrana day you can also participate in this activity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • apj abdul kalam
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.