फोटो सौजन्य सोशल मिडिया
Vasai Dumping Ground Fire : वसई पूर्वे येथिल भोईदा पाडा डम्पिंगला काल रात्री 10 वाजता भीषण आग लागली असून या आगीमुळे वसई डम्पिंग ग्राऊंड परिसरात आगिचे रौद्ररूप पाहण्यास मिळाले. वसई डम्पिंग परिसरातून आगिचे मोठमोठे धुराचे लोटच्या लोट उठत होते. या धुराने संपूर्ण परिसर अक्षरशः व्यापून टाकला होता. आगीचे धूर केवळ भोईदापाड्यापुरता मर्यादित न राहता सातीवली, भोईदापाडा, वालीव, वालीव फाटा, फादरवाडी, एव्हरशाईन, गोखिवरे ते नायगावपर्यंत दूरवर पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. या आगीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई डम्पिंग ग्राउंडमधील कचरा जळत असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. या आगीच्या धुराचे लोट अनेक भागांमध्ये स्पष्टपणे दिसतात. या मुळे आता नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.
वसई डम्पिंग ग्राउंडमधील कचरा जळत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी आणि धुराचे प्रमाण वाढले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच डोळ्यांची जळजळ यांसाखा त्रास नगरिकांना सहन कराव लागत आहे. भोईदापाडा डम्पिंग प्रकल्पाबाबत यापूर्वीही कचरा, दुर्गंधी, प्रदूषण आणि आगीच्या घटनांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होता. आता या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या अग्निसुरक्षा आणि व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
डम्पिंग प्रकल्पाला आग लागते, धुराचे लोट किलोमीटरपर्यंत पसरतात आणि त्याचा थेट परिणाम हजारो नागरिकांवर होतो; तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वसई डम्पिंग प्रकल्पात लागलेल्या आगिमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना होत्या का? आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने किती वेळ घेतला? या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला. या सर्व घटनेची चौकशी होणे गरज आहे. सदर घटना लक्षात घेता; नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षितेचा प्रश्न असून, महापालिका प्रशासनाने केवळ आग विझवण्यापुरती कारवाई न करता या डम्पिंग प्रकल्पाच्या संपूर्ण व्यवस्थेची आणि सुरक्षेची तपासणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करत आहे.
Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू






