Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेदांता, टाटा एअरबस व सॅफ्रन प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गेले, राज्यात रिफायनरी प्रकल्प आणणार – फडणवीस

मविआ सरकारच्या काळातच वेदांता, एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले होते. टाटा एअरबस प्रकल्प 2021 साली राज्याबाहेर गेला. मागील अडीच वर्षात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळं आमच्या सरकारच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेलेला नाही, वेदांता प्रकल्पाबाबत मी उद्धव ठाकरेंशी बोललो होतो, पण ठाकरे सरकारनं त्यावेळी दखल घेतली नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 31, 2022 | 03:48 PM
वेदांता, टाटा एअरबस व सॅफ्रन प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गेले, राज्यात रिफायनरी प्रकल्प आणणार – फडणवीस
Follow Us
Follow Us:

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड दोन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये गेला, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला होता. मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला. त्यानंतर राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत असताना, सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) राज्याबाहेर गेल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत मविआ सरकारवर निशाणा साधला.

[read_also content=”राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे दुर्दैव आहे, राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/mns-president-raj-thackeray-criticizes-pm-narendra-modi-on-all-project-goes-to-gujrat-340634.html”]

वेदांता, टाटा एअरबस, सॅफ्रन प्रकल्प मविआ सरकारच्या काळात गेले

मविआ सरकारच्या काळातच वेदांता, एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले होते. टाटा एअरबस प्रकल्प 2021 साली राज्याबाहेर गेला. मागील अडीच वर्षात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळं आमच्या सरकारच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेलेला नाही, वेदांत प्रकल्पाबाबत मी उद्धव ठाकरेंशी बोललो होतो, पण ठाकरे सरकारनं त्यावेळी दखल घेतली नाही. टाटा इअरबस प्रकल्प नागपुरात येणार म्हणून दुर्लक्ष केलं गेल असावं, असा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केला.

केंद्र सरकार महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक हब बनवणार

दरम्यान, केंद्र सरकार महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक हब बनवणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. तसेच केंद्र सरकार महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क देणार आहे, आम्ही तीन महिन्यात 25 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. टाट एअरबस प्रकल्पासाठी मी स्वत: टाटांसोबत बोललो होतो.

गुंतवणुकीचा बाप म्हणजे रिफायनरी…

रिफायनरीला विरोध करणारे आता रोजगार गेले म्हणायेत. पण आगामी काळात रिफायनरी राज्यात येणार आहे, यात 1 लाख रोजगारनिर्माती होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला. गुंतवणूकीचा बाप म्हणजे रिफायनरी प्रकल्प आहे. त्यामुळं काळजी करण्याचे कारण नाही, कारण आगामी काळात रिफायनरीमुळं एक लाख रोजगार तरुणांना मिळणार आहेत.

आमच्याविषयी नॅरेटिव्ह वातावरण तयार गेलं जातंय

सॅफ्रन प्रकल्प देखील 2021 मध्येच हैदराबादला गेला आहे. हे सर्व प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेले आहेत. महाराष्ट्रात उद्योगासाठी वातावरण चांगल नाही, असं या कंपनीच्या मालकांनी सांगितलं होत. दरम्यान, महाराष्ट्रात आमच्याविषयी नॅरेटिव्ह वातावरण तयार गेलं जात आहे, असा आरोप सुद्धा फडणवीसांनी यावेळी विरोधकांवर केला.

बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्रात नव्हताच

बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्रात होणार असं केंद्राचे एकही विधान दाखवावं. असं फडणवीस म्हणाले. केंद्रानं जर जाहीरच केलं नव्हतं तर मग हा प्रकल्प गेला कसं म्हणणार. पुढील दोन वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पुन्हा नंबर एकवर येईल, असा विश्वास फडणवीसांना व्यक्त केला. सरकार येऊन तीन महिने झालेत, तरी आमची बदनामी सुरु आहे. मुळात बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्रात होणारच नव्हता, पण विरोधक काहीही बोलत आहेत, सत्ता गेल्यानं मविआ सरकारवर परिणाम झाला आहे. अडीच वर्षात एक तरी मोठ काम मविआ सरकारने दाखवावं, अशी टिका फडणवीसांनी विरोधकांवर केली.

Web Title: Vedanta tata arbus and saffron projects went during the mva government devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 03:46 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Shinde fadnvis government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
2

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.