Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकार कट रचत असल्याचा आरोप केला आहे. चार मराठा लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले अवैध ठरल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 12:29 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • कुणबी प्रमाणपत्र वाद पुन्हा पेटला
  • कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा सरकारचा कट
  • फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. कुणबी नोंदी, जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर मुद्द्यांना घेऊन त्यांनी सरकरला पुन्हा एकदा घेरलंय आहे. तसेच मराठा समाजावर अन्याय सुरु आहे, आता सरकारविरोधात मोठी लाट येणार आहे, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिली. मराठवाड्यातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा लोकप्रतिनिधींचे जात पडताळणी समितीने दाखले अवैध ठरवल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, “सरकार जाणीवपूर्वक मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे नियोजनबद्ध कट असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे.

Maratha Reservation: ’28 तारखेपर्यंत प्रमाणपत्र द्या, अन्यथा…’, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, आंदोलनाची घोषणा

मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींच्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी नोंदी आणि त्यासंदर्भातील प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महायुती सरकारवर टीका

यावेळी मनोज जरांगे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आक्रमक भाषण करताना त्यांनी इशारा दिला की, “तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका.” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

जरांगे यांनी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, कुणबी प्रमाणपत्रांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि समाजात संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, यावर सरकारची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या रक्ताची नोंद सापडली आहे. मग आता सरकारला त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. ओबीसींचे प्रमाणपत्र रद्द केले जात नाहीत. मराठा समाजावर अन्याय का केला जातोय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केला आहे. हे आता मराठ्यांना समजलंय, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

Web Title: Manoj jarange pati alleges government conspiracy over kunbi certificates targets fadnavis shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
1

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!
2

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
3

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
4

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.