Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी निर्णायक भूमिका बजावणारे रामकृष्ण वेताळ राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2026 | 01:59 PM
Panvel Municipal Corporation: पनवेलमध्ये राजकारण तापलं! दोन माजी नगरसेवक निलंबित

Panvel Municipal Corporation: पनवेलमध्ये राजकारण तापलं! दोन माजी नगरसेवक निलंबित

Follow Us
Follow Us:
  • कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
  • विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारली
  • उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले
कराड/राजेंद्र मोहिते : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी निर्णायक भूमिका बजावणारे रामकृष्ण वेताळ राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी विद्या वेताळ यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने हा विषय केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता, पक्षांतर्गत राजकारण आणि वर्चस्वाच्या संघर्षावर बोट ठेवणारा ठरत आहे.

 

लोकसभा, कराड उत्तर विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय सुकर करण्यात वेताळ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी क्षेत्राशी निगडित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. याच कामगिरीची दखल घेत भाजपाने त्यांच्यावर किसान मोर्चाचे सरचिटणीस आणि कृषी संपर्क समन्वयक यासारख्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. हजारो युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम त्यांनी केले. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि काही प्रभावशाली गटांशी झालेला थेट संघर्ष हाच त्यांच्या अडचणींचा प्रारंभ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारून राजकीय आकसातून खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप वेताळ यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मौन अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारीचे सर्वाधिकार आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट केले, तर खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘एकला चलो रे’ म्हणत संघर्षाला नवी दिशा

भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर विद्या वेताळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वैयक्तिक लढा नसून, पक्षातील अन्यायाविरोधातील संघर्ष असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. विद्या वेताळ यांनी ‘एकला चलो’ची भूमिका स्वीकारली आहे. हा संघर्ष आता केवळ एका गटापुरता मर्यादित न राहता, भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

मुलाखतीचा दावा संशयाच्या भोवऱ्यात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ उपस्थित होते. कोपर्डे हवेली गटातून विद्या वेताळ यांनी मुलाखत दिल्याचे स्पष्ट असतानाही नंतर त्यांनी मुलाखतच दिली नाही, असा दावा करण्यात आला. याचे रामकृष्ण वेताळ यांनी ठामपणे खंडन केले आहे. उमेदवारी मागणीसाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा दावा अधिक संशयास्पद ठरत आहे.

Web Title: Vidya vetals supporters have become aggressive after bjp rejected her candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Karad
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
1

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
2

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
3

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
4

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.