Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीनंतर वातावरण तापलं असताना, आता शहरात प्रचाराचा खरा थरार जाणवू लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2025 | 05:50 PM
इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

Follow Us
Close
Follow Us:
  • इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली
  • दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम
  • निवडणूक वातावरण रंगतदार
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीनंतर वातावरण तापलं असताना, आता शहरात प्रचाराचा खरा थरार जाणवू लागला आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा आणि कृष्णा-भीमा विकास आघाडीचे प्रदीप गारटकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात जनसंपर्काचा वेग वाढवला असून, दोन्ही बाजूंनी तुफान मोहीम उभी टाकली आहे. गारटकर यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपाचे नेते प्रवीण माने, आणि स्वतः गारटकर हे शहरातील विविध प्रभागांत सभा, कोपरा बैठका, संवाद यांची मालिका राबवत आहेत. प्रत्येक गल्लीबोळात होणाऱ्या या बैठकींमुळे आघाडीच्या पथकाला मोठा प्रतिसाद मिळत असून, वातावरणात ठसा उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न जोरदार सुरू आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा यांनी होम टू होम मोहीम आक्रमकपणे सुरू केली आहे. त्यांच्या संपर्क मोहिमेला साथ देण्यासाठी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, बंधू मुकुंद शहा हे घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्याचसोबत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनीही शहरात अनेकांच्या भेटी घेत प्रचाराला वेग दिला आहे. शुक्रवारपासून राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेही शहरातील विविध भागांत सभा घेणार असून, या सभांमुळे राष्ट्रवादीच्या प्रचारात आणखी दम येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रचारावर विशेष लक्ष

निवडणुकीचा रंगतदार माहोल फक्त रस्त्यांवरच नाही तर सोशल मीडियावरही दिसून येत आहे. दोन्ही बाजूंकडून डिजिटल प्रचारावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, बाहेरगावी असलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केला जात आहे. दरम्यान, शहरात जेवणावळींचा ट्रेंडही सुरू झाला आहे. प्रभागनिहाय आयोजित केल्या जाणाऱ्या या जेवणावळींनी प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे. प्रचाराची गती वाढताच हॉटेलांमध्येही गर्दी वाढल्याचे चित्र कायम आहे. एकीकडे हिवाळ्याचा गारवा वाढत असताना, दुसरीकडे इंदापूरच्या राजकारणात ‘गरमाई’ शिगेला पोहचली असून, कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vigorous campaigning is underway by both candidates for the indapur municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Election News
  • indapur news

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास
1

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास

Chakan News: बड्या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना वेग
2

Chakan News: बड्या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना वेग

‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान
3

‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ
4

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.