Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Keval Chaudhary Swimmer: विरारचे जलतरणपटू केवल चौधरी यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील भागीरथी नदीतील 81 किलोमीटरची खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीसह 81 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणारे पालघर जिल्ह्यातील पहिले जलतरणपटू ठरल्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 02:50 PM
81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Follow Us
Follow Us:
  • भागीरथी नदीत 81 KM पोहले
  • पालघरचे केवल चौधरी ठरले पहिले जलतरणपटू
  • विरारच्या केवल चौधरींची ऐतिहासिक कामगिरी
  • खडतर भागीरथी नदीत 81 किलोमीटरचे आव्हान फत्ते
निलेश महाडीक, वसई-विरार: जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विरारचे जलतरणपटू केवल चौधरी यांनी खडतर आव्हान पार करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भागीरथी नदीत रविवारी, 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तब्बल 81 किलोमीटरच्या खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेचे संपूर्ण अंतर त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामगिरीमुळे 81 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणारे पालघर जिल्ह्यातील पहिले जलतरणपटू म्हणून केवल चौधरी यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Keval Chaudhary Swimmer)

पहाटे 5 वाजता सुरू झाले आव्हान

भागीरथी नदीतील या स्पर्धेला सकाळी 5 वाजता सुरुवात झाली. खुल्या पाण्यातील लांब पल्ल्याच्या जलतरणात नदीचा प्रवाह, बदलते वातावरण आणि शरीरावर येणारा प्रचंड ताण ही मोठी आव्हाने असतात. मात्र, केवल चौधरी यांनी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण वेग राखला. 35 ते 40 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतरही त्यांनी आत्मविश्वास कायम ठेवत पुढील प्रवास सुरू ठेवला. अनेक तास पाण्यात राहिल्यामुळे होणारा थकवा आणि मानसिक ताण यावर मात करत त्यांनी अखेर 81 किलोमीटरचे निर्धारित अंतर पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्या या यशामध्ये शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक कणखरता आणि शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती महत्त्वाची ठरली.

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

महिन्यांच्या कठोर सरावाचे फळ

या ऐतिहासिक कामगिरीमागे केवल चौधरी यांची अनेक महिन्यांची मेहनत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील जलतरण तलावात त्यांनी नियमित सराव केला. लांब पल्ल्याच्या जलतरणासाठी आवश्यक असलेला स्टॅमिना, वेग आणि मानसिक तयारी वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. या प्रवासात त्यांना प्रशिक्षक विद्यानंद मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेला शिस्तबद्ध सराव आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर त्यांनी 81 किलोमीटरचे खडतर लक्ष्य गाठले.

विरारसह पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

केवल चौधरी यांच्या कामगिरीमुळे विरार आणि वसई-विरार परिसरातील जलतरणपटू व क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातून 81 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणारे पहिले जलतरणपटू ठरल्याने त्यांच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. आपल्या यशानंतर केवल चौधरी यांनी वसई-विरार महानगरपालिका, प्रशिक्षक विद्यानंद मुळीक, जलतरण तलावातील कर्मचारी, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. स्पर्धेच्या तयारीपासून प्रत्यक्ष सहभागापर्यंत मिळालेल्या सहकार्यामुळेच हे मोठे आव्हान पूर्ण करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

81 किलोमीटरचे लक्ष्य, अनेक तासांचा खडतर जलप्रवास आणि शेवटपर्यंत कायम असलेली जिद्द, केवल चौधरी यांच्या या कामगिरीने पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला असून नवोदित जलतरणपटूंसाठीही त्यांचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा

Web Title: Virar swimmer keval chaudhari completes 81 km bhagirathi river swimming palghar record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Sports
  • virar
  • West bengal

संबंधित बातम्या

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण
1

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
2

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.