Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईत ‘अश्विना डायलिसिस सेंटर’चे शानदार उद्घाटन; डायलिसिस रुग्णांना मिळणार मोठा दिलासा!

'अश्विना डायलिसिस सेंटर' हे डायलिसिस रुग्णांना दिलासा देण्यात आघाडीवर राहील, असा विश्वास वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 09:37 PM
वाईत 'अश्विना डायलिसिस सेंटर'चे शानदार उद्घाटन;

वाईत 'अश्विना डायलिसिस सेंटर'चे शानदार उद्घाटन;

Follow Us
Close
Follow Us:
  • वाईत ‘अश्विना डायलिसिस सेंटर’चे उद्घाटन
  • अनेक मान्यवरांची उपस्थिती
  • वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केला विश्वास
सामाजिक भावनेतून राबवलेले उपक्रमच दीर्घकाळ टिकतात आणि समाजाला खऱ्या अर्थाने उपयोगी ठरतात, असे प्रतिपादन वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष Sachin Nanaware यांनी केले. Ashwina Dialysis Center च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिसरातील वैद्यकीय, सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर होते. यावेळी पत्रकार विकास जाधव, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. रूपाली पवार, डॉ. स्नेहल शिंगटे, डॉ. नाज मकानदार, डॉ. आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ आप्पा राऊत आणि विशाल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी प्रकल्पांची गरज अधोरेखित केली.

Ahilyanagar News: डासांमुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात! उपाययोजनेची राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

महादेव शिवाचार्य महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, Dattatray Pandurang Menbudale Pratishthan च्या माध्यमातून डॉ. मेणबुदले विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. समाजात ‘माणुसकी’ जपणाऱ्या व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्तींची नितांत गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. महेश मेणबुदले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण आणि उपनगरातील अनेक रुग्णांना डायलिसिससाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. ही अडचण लक्षात घेऊन वाईमध्येच परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. अत्यंत माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

CM Devendra Fadnavis: जल जीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनात करार

या नव्या डायलिसिस सेंटरमुळे वाई व परिसरातील रुग्णांना आता जवळच उपचाराची सुविधा मिळणार असून, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Web Title: Wai ashwina dialysis center inauguration big relief for dialysis patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?
1

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?
2

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?
3

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास
4

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.