Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Wai : वाई एम.आय.डी.सी. परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 14, 2026 | 09:41 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Wai :  एम.आय.डी.सी. परिसरातील अर्थव फाउंड्री कंपनीच्या कथित प्रदूषणामुळे शेती, पिके आणि विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. सन २००८ पासून तब्बल १८ वर्षे हा त्रास सहन करूनही कंपनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आता तीव्र झाला आहे.

शंकर एकनाथ शेलार आणि सौ. तेजस्विनी शैलेश राजपूरे यांनी प्रांताधिकारी, वाई विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनात कंपनीच्या कारभाराविरोधात गंभीर तक्रारी मांडल्या आहेत. कंपनीच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे शेतातील पिकांवर राखेचा थर बसतो आणि पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच कंपनीतून बाहेर पडणारे रासायनिकदृष्ट्या दूषित सांडपाणी शेतातील विहिरींमध्ये मिसळत असल्याने पाण्याचे प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पावसाळ्यात कंपनीतील सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे पाणी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडले जाते. परिणामी शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या मार्गावर मोठे अडथळे निर्माण होत असून शेतीची कामेही प्रभावित होत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या समस्यांबाबत कंपनीच्या मालकांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

प्रशासनाकडे यापूर्वीही तक्रारी करूनही अद्याप कंपनीविरोधात ठोस कारवाई झालेली नसल्याने “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे गेल्या २००८ ते २०२६ या कालावधीत सातत्याने शेतीचे नुकसान होत असूनही संबंधित कंपनी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ निवेदने आणि तक्रारी करून प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.“आगामी चार दिवसांत अर्थ फाउंड्री कंपनीविरोधात योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही,तर

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाई तहसीलदार कार्यालयासमोर सर्व संबंधित शेतकरी आमरण उपोषणास बसतील,” असा स्पष्ट आणि कडक इशारा निवेदनातून देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी, पाणी व मातीचे नमुने तपासणी, सांडपाणी व्यवस्थेची चौकशी तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानभरपाई देण्यात येणार का? याकडे आता वाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता तरी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Wai farmers up in arms against arthav foundry in midc warning of an indefinite hunger strike starting august 15 due to administrative apathy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • MIDC
  • Wai News

संबंधित बातम्या

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण
1

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण

8th Pay Commission वर सरकारचा मोठा खुलासा! वाढीव पगारासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?
2

8th Pay Commission वर सरकारचा मोठा खुलासा! वाढीव पगारासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
4

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.