Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निविदा प्रक्रिया पारदर्शक; ७५ लाखांची बचत केली, घोटाळ्याचा प्रश्नच नाही – नगराध्यक्ष अनिल सावंत

वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून सुरू झालेल्या वादावर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून १५ टक्के कमी दराच्या निविदेमुळे नगरपरिषदेची ७५ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 09:01 PM
निविदा प्रक्रिया पारदर्शक; ७५ लाखांची बचत केली, घोटाळ्याचा प्रश्नच नाही - नगराध्यक्ष अनिल सावंत

निविदा प्रक्रिया पारदर्शक; ७५ लाखांची बचत केली, घोटाळ्याचा प्रश्नच नाही - नगराध्यक्ष अनिल सावंत

Follow Us
Follow Us:

वाई प्रतिनिधी : वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून सोशल मीडियावर उडालेल्या आरोपांच्या धुरळ्याला अखेर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी केलेले सर्व आरोप “बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे” असल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक असल्याचे ठामपणे सांगितले. याचबरोबर संबंधित निविदेमुळे वाई नगरपालिकेची तब्बल ७५ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा करत विरोधकांच्या आरोपांचा पुराव्यानिशी समाचार घेतला.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नगरपरिषदेच्या कारभाराबाबत संशय निर्माण करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होत्या. या पार्श्वभूमीवर बोलताना सावंत म्हणाले, “निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून तिच्या सर्व ‘कीज’ केवळ अधिकाऱ्यांकडे असतात. नगराध्यक्ष किंवा कोणताही लोकप्रतिनिधी या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. नियमांनुसार चार सदस्यीय निविदा समितीने सर्व प्रक्रिया पार पाडून १५ टक्के कमी दराची निविदा मंजूर केली आहे.”

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’ या कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत सावंत म्हणाले, “मी त्या संस्थेला ओळखतही नाही. माझे नाव हेतुपुरस्सर या प्रकरणात ओढले जात आहे.”

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

यानंतर त्यांनी विरोधकांवर थेट राजकीय हल्ला चढवला. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याचे सांगत त्यांनी आरोप केला की, हा ठेका मिळवण्यासाठी एका राजकीय पक्षाशी संबंधित एजंटने विविध प्रकारचे दबाव आणि आमिषांचे राजकारण केले आहे व वाईच्या विकासामध्ये हा राजकीय एजंट वाईच्या विकासाला खिळ घालत असल्यासही नगरसेवक अनिल सावंत यांनी स्पष्ट केले तर काही लोकल कार्यकर्ते मंत्र्याचा पीए बोलतोय असं सांगून नगर परिषदेमध्ये वारंवार फोन करून दिशाभूल केल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले तर काहीं  नगरसेवकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला, इतकेच नव्हे तर एका मंत्र्यांच्या पी.ए. असल्याचे वारंवार सांगून प्रशासनावर दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पारदर्शक निविदा प्रक्रियेवर आपण ठाम राहिल्याने हे सर्व डाव उधळून लागल्याचा दावा त्यांनी केला.

सावंत यांनी आणखी एक गंभीर दावा करत सांगितले की, ५ कोटी रुपयांची निविदा तब्बल १४ महिने प्रलंबित ठेवण्यात आली होती. त्यातील आठ महिन्यांच्या विलंबामागे नेमके कोण जबाबदार आहे, याचाही लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “स्थायी समितीने मंजूर केलेली निविदा ५ कोटींऐवजी ४ कोटी २५ लाख रुपयांची आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे थेट ७५ लाख रुपये वाचले. जनतेच्या पैशाची बचत करणे हा गुन्हा असेल, तर वाईकरांसाठी असा गुन्हा मी रोज करायला तयार आहे.”पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांनाही थेट आवाहन केले.

“या संपूर्ण निविदा प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे नगरपालिकेत उपलब्ध आहेत. कोणालाही शंका असल्यास त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. आम्ही पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवतो आणि वाईकरांनी दिलेला विश्वास कोणत्याही परिस्थितीत तुटू देणार नाही,” असे ते म्हणाले.

नगराध्यक्षांच्या या आक्रमक आणि पुराव्यांचा दावा करणाऱ्या भूमिकेमुळे वाईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधक यावर काय भूमिका घेतात आणि या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Satara News: स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला ‘हायड्रो जेटिंग’ मशीन प्राप्त; गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता

यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के,विरोधी पक्षनेते विजय ढेकाने,यांच्या सह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

या टेंडर प्रक्रियेत 5 ठेकेदार सहभागी झाले होते.टेंडर धारकाकडे 5 नगरपंचायत अथवा नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्या कामाचा अनुभवाचा दाखला असणे बंधनकारक होते. तर त्या ठेकेदारांची सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाची ‘कार्यादेश'(वर्क ऑर्डर) जोडण्याची सूचना देखील नियम अटी शर्थी मध्ये नमूद करण्यात आली होती. यातील नियमांचा आधार घेऊन 5 पैकी 3 ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, याबाबत टेंडर प्रक्रिया समितीमधील शासकीय चार सदस्यीय कमिटीमध्ये मतभिन्नता आल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिसऱ्या टेंडरचे ‘बीड’ स्थायी समितीच्या ठरावाने उघडण्यात आले. याच तिसऱ्या ठेकेदाराची निविदा 15 टक्के कमी दराची असल्याने ‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’ ला हा ठेका मिळाला. यातूनच आधीच्या तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला पुन्हा संधी का मिळाली यावरून हा वाद सुरू झाल्याचे जाणकारांचे मत आहे

Web Title: Wai municipal tender controversy anil sawant clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.