Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Wardha News : वर्ध्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली मुला-मुलींची दोन वसतिगृहे सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. स्वतंत्र इमारतीसाठी सिंदी मेघे येथे जागा निश्चित झाली असून जमीन हस्तांतरण आणि निधी मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 22, 2026 | 06:05 PM
Wardha hostel

Wardha hostel

Follow Us
Follow Us:
  • नालवाडीतील मुला-मुलींची दोन्ही ओबीसी वसतिगृहे भाड्याच्या जागेत
  • सिंदी मेघे परिसरात स्वतंत्र वसतिगृहासाठी जागा निश्चित
  • जमीन हस्तांतरण आणि निधी मंजुरीनंतर बांधकामाला मिळणार गती
 

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी नालवाडी परिसरात सुरू असलेली दोन स्वतंत्र वसतिगृहे सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. स्वतःची हक्काची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना भाड्याच्या जागेतच राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, स्वतंत्र वसतिगृहाच्या इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून सिंदी मेघे परिसरात जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

नालवाडी येथे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची स्वतंत्र वसतिगृहे सुरू आहेत. सध्या मुलींच्या वसतिगृहात ४८ विद्यार्थिनी, तर मुलांच्या वसतिगृहात ६० विद्यार्थी वास्तव्यास आहेत.

दोन्ही वसतिगृहांना स्वतःची इमारत नसल्याने भाड्याच्या जागेत विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाकडून या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ताही दिला जातो. भोजनासाठी विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार ५०० रुपयांचा निर्वाह भत्ता मिळतो. विद्यार्थिनींसाठी यासोबत स्वतंत्र स्वच्छता भत्त्याचीही तरतूद आहे.

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सिंदी मेघेतील जागा निश्चित

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी आणि स्वतंत्र इमारत उभारण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडे काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रशासनाने सिंदी मेघे परिसरातील जागा वसतिगृहासाठी निश्चित केली आहे. सध्या या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

मात्र जमीन हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर होणे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरच दोन्ही वसतिगृहांच्या स्वतंत्र इमारती उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार कायमस्वरूपी सुविधा

सध्या भाड्याच्या इमारतीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःच्या इमारतीत अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सिंदी मेघे येथील जागेचं हस्तांतरण, निधी मंजुरी आणि बांधकामाची प्रक्रिया कधी मार्गी लागते, याकडे ओबीसी विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

स्वतंत्र इमारत उभी राहिल्यास विद्यार्थ्यांच्या निवासाची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार असून, वसतिगृहाच्या सुविधांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड

Web Title: Wardha news obc students hostel rented building sindi meghe proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • obc
  • Student
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
1

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
2

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
3

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
4

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.