Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा; निलंबनानंतर SIO आणि रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल

वर्धा तहसील कार्यालयातील 31.77 लाखांच्या कथित धान्य घोटाळा प्रकरणात आता फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे आणि स्वस्त धान्य दुकानदार योगेश भोले यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 10:11 PM
वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा

वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यातील 31.77 लाखांच्या कथित धान्य घोटाळ्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
  • नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिका वळती केल्याचा अधिकाऱ्यांवर आरोप.
  • 619 अर्जांपैकी 337 अर्जांची पडताळणी करण्यात आली; अनेक कार्डधारकांनी अर्ज केला नसल्याचे चौकशीत समोर
 

वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात समोर आलेल्या 31.77 लाख रुपयांच्या कथित स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणी निलंबित तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे आणि स्वस्त धान्य दुकानदार योगेश भोले यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी या प्रकरणाची कार्यालयीन चौकशी करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर माजरखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिका वळती केल्याचा आरोप

नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांच्या तक्रारीनुसार, वर्धा जिल्हा सहकारी होलसेल व रिटेल कन्झुमर्स सोसायटीच्या जोड दुकानाशी संबंधित ई-पॉस मशीनवर नियमांचे पालन न करता शिधापत्रिकांची ‘RC Transfer’ करण्यात आली.

Wardha News : वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा, दमदार पावसाची प्रतीक्षा

तक्रारीनुसार, संबंधित अर्ज उपलब्ध नसतानाही काही शिधापत्रिका नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या दुकानाकडे वळती करण्यात आल्या. तहसीलदारांच्या तपासणीत तालुका पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांच्या लॉगिन आयडीचा वापर करून या प्रक्रिया करण्यात आल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

619 अर्जांपैकी 337 अर्जांची पडताळणी

या प्रकरणात एकूण 619 अर्जांपैकी 337 अर्ज प्राप्त झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या अर्जांची पडताळणी करताना संबंधित कार्डधारकांकडून लेखी जबाब घेण्यात आले. यातील काही कार्डधारकांनी आपण शिधापत्रिका वळती करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नसल्याचे तसेच संबंधित दुकानातून धान्य उचलले नसल्याचे जबाबात नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारीनुसार, अधिकाऱ्यांच्या लॉगिन आयडीचा कथित गैरवापर करून मोठ्या संख्येने ‘सायलेंट RC’ एकाच दुकानाकडे वळती करण्यात आल्या. त्यानंतर धान्याची उचल झाल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मनीषा माजरखेडे आणि योगेश भोले या दोन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिका वळती करून शासनाच्या धान्याची उचल करण्यात आल्याचे आरोप असल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Wardha ration scam 31 77 lakh sio ration shopkeeper case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे
1

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

Wardha News : वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा, दमदार पावसाची प्रतीक्षा
2

Wardha News : वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा, दमदार पावसाची प्रतीक्षा

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम
3

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती
4

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.