Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Wardha News : वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. खुल्या बाजारात सोयाबीनला ५,९०० ते ६,७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असला, तरी कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. नाफेडची हमीभावाने खरेदी सुरू होणार की नाही, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 05:27 PM
Soyabean

Soyabean

Follow Us
Follow Us:
  • सोयाबीनला प्रतिक्विंटल ६,७०० रुपयांपर्यंत भाव
  • पावसाच्या खंडामुळे उत्पादनाला फटका
  • उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
 

Wardha News : वर्धा जिल्हयात यावर्षी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी प्रमाणात झाले. हमीभाव ५,७०७ रुपये असला तरी खुल्या बाजारात यापेक्षा एक हजार रुपये अधिक भाव दिल्या जात आहे. दरवर्षी प्रमाणे सोयाबीनच्या बाजारभावाची चिंता शेतकऱ्यांना नाही. परंतु, उत्पादन कमी झाल्याने याचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार नसल्याचे चित्र आहे. जिल्हयात यावर्षी १ लाख २५ हजार ६५४.९४ हेक्टर परिसरात सोयाबीनची पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले होते.

यावर्षी पावसाळयाच्या सुरवातीला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणीला उशीर झाला. त्यामुळे १ लाख १९ हजार ७४०.७० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. दरवर्षी सोयाबीनची निर्धारित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी करण्यात येते. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला यावर्षी ५ हजार ७०७ रूपये हमीभाव घोषित केला आहे.

नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी काही प्रमाणात उरलेसुरले सोयाबीन बाजारात येत होते. त्या सोयाबीनला ७हजार रुपयांचे जवळपास भाव देण्यात येत होता. आता दसरा व दिवाळी देखील जवळ येत आहे. यामुळे शेतात उरले सुरले सोयाबीनची कटायी करून शेतकरी बाजारात विकण्यासाठी आणत आहे. यामुळे भाव काही प्रमाणात कमी झाले आहे. सोयाबीनला ५,९०० ते ६ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव देण्यात येत आहे. परंतु, सोयाबीनच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे. यामुळे हमीभावापेक्षाही एक हजार रुपये अधिक भाव मिळूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणे कठीण जाणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना; 9 महिन्यांत 107 शेतकऱ्यांची आत्महत्या

सोयाबीनच्या दाण्यात आर्द्रता नाही

दरवर्षी सोयाबीन बाजारात आल्यानंतर दाण्यामध्ये आर्द्रता (ओलावा) असल्याचे कारणाने भाव कमी देण्यात येत होते. नाफेडच्या वतीने देखील हमी भावापेक्षाही कमी भाव देण्यात येत होते. यावर्षी दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे कडक उन्हामुळे भरलेल्या शेंगा फुटल्या आहे. दाणे कडक वाळले आहे. यामुळे देखील बाजारात चांगला भाव मिळत आहे.

नाफेडची खरीदी राहणार बंद

नवीन सोयाबीन बाजारात येताच भाव खाली घसरते, त्यामुळे हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येते. यावर्षी याविपरित स्थिती बाजारात आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने नाफेडची खरेदी बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत बोलताना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे म्हणाले, “सोयाबीनच्या निच्या उत्पादन कमी झाले आहे. अत्यंत दुष्काळ पडलेल्या मराठवाड्यातील जिल्हयात सोयाबीनचे उत्पादनच झाले नाही. यामुळे सोयाबीनचा शॉर्टज वाढला आहे. यामुळे खुल्या बाजारात भाव अधिक मिळत आहे. काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कापूस वाळण्यास सुरवात होणार आहे. रब्बीचे पीक घेणे अनेक शेतकऱ्यांना शक्य नाही, यामुळे शेतकऱ्याची संपूर्ण भिस्त ही सोयाबीन पिकावरच अवलंबुन आहे.”

बळीराजाची दिवाळी गोड होणार! शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Web Title: Wardha news soybean price production drop farmer crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • soyabin news
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा
1

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
2

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
3

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
4

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.