Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

आष्टी शहरातील तालुका क्रीडा संकुलात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने खेळाडू आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. पाणी, स्वच्छतागृह, धावण्याचा ट्रॅक आणि कबड्डी-खो-खोच्या मैदानांची मागणी होत आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 09:34 PM
पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

Follow Us
Follow Us:
  • आष्टीतील क्रीडा संकुलात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार
  • पाणी, स्वच्छतागृह आणि धावण्याचा ट्रॅक उपलब्ध नसल्याचा आरोप
  • तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नागरिकांचे सवाल
आष्टी (शहीद): वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले आष्टी तालुका क्रीडा संकुल सध्या विविध समस्यांनी त्रस्त असल्याची तक्रार नागरिक आणि क्रीडाप्रेमींकडून होत आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या संकुलातच खेळाडू आणि नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

या क्रीडा संकुलात दररोज शेकडो नागरिक व्यायाम, धावणे आणि फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार आहे. स्वच्छतागृहाची सुविधाही अपुरी असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येते.

धावपटूंसाठी ट्रॅक कुठे?

क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक सुविधांचा अभाव असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. कबड्डी आणि खो-खोसारख्या पारंपरिक खेळांसाठी स्वतंत्र अथवा व्यवस्थित आखणी केलेली मैदाने नसल्याची तक्रार क्रीडाप्रेमींनी केली आहे.

Wardha News : एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित

धावपटूंसाठी आवश्यक असलेला धावण्याचा ट्रॅकही व्यवस्थित उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सराव करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. शासनाचा निधी खर्च करून उभारलेल्या संकुलातच दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध नसतील तर या खर्चाचा उद्देश कितपत साध्य झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निधी खर्चूनही उद्देश अपूर्ण राहण्याची भीती

क्रीडा संकुलाचा उपयोग केवळ इमारत आणि मोकळ्या जागेपुरता मर्यादित न राहता स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होणेही आवश्यक आहे.

मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव कायम राहिल्यास शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि क्रीडा विभागाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

क्रीडा संकुलातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणार कोण आणि त्यावर कार्यवाही करणार कोण, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्यामुळे संकुलाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर

माजी सरपंच रवी गंजीवाले यांनीही अधिकाऱ्यांच्या कथित अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची नियुक्ती आष्टी येथे असतानाही ते महिन्यातून क्वचितच येतात. त्यामुळे संकुलाची दुरवस्था होत असून खेळाडूंच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आष्टी तालुका क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, धावण्याचा ट्रॅक तसेच कबड्डी आणि खो-खोसाठी आवश्यक मैदाने यांसह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी केली आहे.

Web Title: Wardha news ashti taluka sports complex lack of facilities officer absence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Sports
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित
1

Wardha News : एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर
2

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा
3

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

Wardha News : ९,१२१ गॅस ग्राहक वांध्यात, वेळीच केली नाही ई-केवायसी तर सबसिडी होणार बंद
4

Wardha News : ९,१२१ गॅस ग्राहक वांध्यात, वेळीच केली नाही ई-केवायसी तर सबसिडी होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.