Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Wardha News : म्हसाळा येथे झालेल्या जनसंवाद उपक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धेसह शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या विकासासाठी विविध निधीतून आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांकडून विविध मागण्यांची तब्बल १०० निवेदने प्राप्त झाली.

  • By विवेक
Updated On: Sep 07, 2026 | 03:47 PM
'वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,' पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

'वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,' पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • म्हसाळा परिसरातील रस्ता आणि नाली कामांसाठी १ कोटी ७२ लाख ५० हजारांचा निधी
  • म्हसाळा टी-पॉईंट ते सेवाग्राम रस्त्याच्या ५० लाखांच्या कामाचे भूमीपूजन
  • जनसंवादात ग्रामस्थांकडून विविध मागण्यांची १०० निवेदने प्राप्त
 

Wardha News : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ले-आऊटच्या माध्यमातून विस्तार होत आहे. पूर्वी या ले-आऊटधारकांनी आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्या नाही. त्यामुळे परिसरात रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, वीज अशा आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी नागरी सुविधा, जिल्हा नियोजन समितीच्या निधी सोबतच म्हाडाच्या निधीमधून आवश्यक सुविधा निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

म्हसाळा येथे पालकमंत्री डॉ. भोयर यांचा जनसंवाद उपक्रम आयोज त करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, विशेष कार्य अधिकारी सुरेश बगळे, म्हसाळाचे माजी उपसरपंच संदेश किटे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार, दिलीप चव्हाण, राज धमाने, बंटी गोसावी, नितीन डफळे, पृथ्वीराज शिंदे आदींची उपस्थिती होती.

काय म्हणाले डॉ. पंकज भोयर?

म्हसाळा येथे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देऊन विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. या परिसरातील रस्ता, नाली बांधकामासाठी १ कोटी ७२ लाख ५० रुपयाची निधी उपलब्ध करुन कामे पूर्ण करण्यात आली. म्हसाळा टी पॉईंट ते सेवाग्राम रस्त्याच्या ५० लाख रुपयाच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे सेवाग्राम रस्त्यावरुन थेट म्हसाळा येथे जाणाऱ्या नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार असल्याचे पुढे बोलताना डॉ. भोयर म्हणाले.

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास

वर्धा जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचतगटाची चळवळ मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील ५० हजाराच्यावर महिला लखपती दिदी झालेल्या आहे. येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महिला बचत भवनाच्या माध्यमातून महिलांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

विविध १०० तक्रारी

जनसंवाद उपक्रमात म्हसाळा येथील ग्रामस्थांकडून रस्ता बांधकाम करणे, नाली बांधकाम करणे, घरकूल मागणी तसेच जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत १०० निवदेन प्राप्त झाली. या निवेदनावर लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे ग्रामस्थांना पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. तत्पूवी म्हसाळा टी-पॉईंट ते सेवाग्राम रोड येथील रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

Web Title: Wardha news development of wardha and neighbouring gram panchayats pankaj bhoyar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Dr. Pankaj Bhoyar
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद
1

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड
2

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास
3

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.