Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश

Wardha News : वर्ध्यातील सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीच्या विकासकामातील कथित विलंबाचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने २० ऑगस्टच्या निवेदनातील मुद्द्यांची चार आठवड्यांत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 02:35 PM
Bombay HC Nagpur Bench

Bombay HC Nagpur Bench

Follow Us
Follow Us:
  • संबंधित अधिकाऱ्यांना चार आठवड्यांत चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश
  • रस्त्यासाठी ७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
  • निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागणार
 

Wardha News : सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीअंतर्गत विकासकामात कथित विलंब तसेच संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी चार आठवड्यांच्या आत चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कांबळे यांनी याचिकेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राहुल जुमडे तसेच संबंधित ठेकेदार अरविंद निकोसे यांचा उल्लेख केला आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेल्या सर्व संबंधित मुद्द्यांचा विचार करून नियमानुसार चौकशी व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. हे प्रकरण सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीअंतर्गत सारिका अपार्टमेंट ते पालोती मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाशी संबंधित आहे.

रस्त्याच्या बांधकामासाठी ७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद

कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामपंचायत सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या रस्त्याच्या बांधकामासाठी ७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आणि २० जून २०२५ रोजी कार्यारंभआदेश जारी करण्यात आला. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्धा येथील अरविंद कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले.

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

करारातील अटींनुसार काम तीन महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रे व निवेदने देऊनही अपेक्षित प्रगती झाली नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. याशिवाय ग्रामपंचायतीतील विविध कार्माच्या निविदा प्रक्रियेसह यापूर्वीच्या लेखापरीक्षणात उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

…तर पुन्हा न्यायालयात दाद मागणार

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली. निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सौरभ भेंडे, अॅड. तेजल आगरे यांनी बाजू मांडली.

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू

Web Title: Wardha news sawangi meghe gram panchayat development work inquiry bombay high court vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
1

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
2

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
3

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू
4

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.