Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

Wardha News: जूननंतर जुलै महिन्यातही वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयांतील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 02:31 PM
जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो : यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९० ते ९२ टक्केच पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला होता. जूननंतर जुलैतही जिल्ह्यात पावसाची तूट कायम असल्याने हवामान विभागाचा हा अंदाज आता खरा ठरू पाहत आहे.

विशेष म्हणजे मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांतील पाणी पातळीत पाहिले तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्याही खोळंबल्या होत्या. नंतर पेरणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सध्या पीक परिस्थिती समाधानकारक आहे.

अंकुरलेले कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस बेपत्ताच झाल्याने अंकुरलेल्या पिकांना चांगलीच तडन सोसावी लागली. तर नंतर रिमझिम पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. तसेच आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील माठे व मध्यम जलाशय निम्म्याहून अधिक रितेच आहेत.

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार

जूनमध्ये ७५ तर जुलैमध्ये ६८.५ टक्के पाऊस

यंदा जून महिन्यात दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण अल-निनो व वातावरणातील बदलामुळे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७५ टक्केच पाऊस झाला. तर जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ६८.०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात येत्या काळात मुसळधार पाऊस होत जलाशय फुल्ल न झाल्यास जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आगामी काळात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

जुलै महिन्यातील पावसाची टक्केवारी

  • वर्धा – ८१,००
  • आष्टी – ७८.०५
  • देवळी – ७४.०६
  • कारंजा – ७२.०४
  • आर्वी – ६८.००
  • सेलू – ६३.०८
  • समुद्रपूर – ६३.०७
  • हिंगणघाट – ५५.०७
४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा …

जलाशयातील पाणी पातळी

  • निम्न वर्धा – ६५.१७
  • वर्धा कार नदी प्रकल्प – ६०.५८
  • बोर प्रकल्प – ५९.५६
  • धाम प्रकल्प – ५१.७१
  • डोंगरगाव प्रकल्प – ३६.१३
  • लाल नाला – ३१.६७
  • वडगाव प्रकल्प – २७.११
  • पंचधारा प्रकल्प – २६.५१
  • पोथरा प्रकल्प – २४.६२
  • सुकळी लघु प्रकल्प – १६.१६

Web Title: Wardha rainfall deficit july water reservoir levels water conservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Monsoon 2026
  • wardha
  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
1

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
2

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा
3

Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
4

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.