मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरस्थिती (Flood) ओसरली आहे. तर, मुंबईसह, ठाणे (Mumbai Rain) परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्णतेत वाढली होती. तसेच, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorology Department) वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण,दमट हवामान आहे.पाउस नसल्याने व आर्द्रतेची उच्च पातळी असल्याने अस्वस्थता निर्देशांक (DI) खूप जास्त अाहे आणि तो असह्य पण होतोय.
मुंबईकर पावसाची वाट पाहत आहे.येत्या 2,3 दिवसात मुंबईत पावसाची शक्यता.तोवर आरोग्याची काळजी घ्या व स्वतःला हायड्रेट ठेवा. pic.twitter.com/czgOhOGAgP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2022
मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान होते. रात्री पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी (Take Care Of Heath), असे आवाहन प्रशानाकडून करण्यात आले आहे.