Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गट स्पर्धा अभियान (फार्मर ग्रुप लीग - FGL) २०२६ ला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ७६८ शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 08:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Washim News : वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गट स्पर्धा अभियान (फार्मर ग्रुप लीग – FGL) २०२६ ला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६८ शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून कृषी क्षेत्रात सामूहिक कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्रात सहभागी शेतकरी गटांच्या प्रतिनिधींसाठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात अभियानाची संकल्पना, स्पर्धेचे निकष, गट व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन, बियाणे उगवण चाचणी, बीजप्रक्रिया, सरी-वरंबा व बीबीएफ पद्धती, शेत पुनर्भरण खड्डे, नैसर्गिक शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि पीक संरक्षण यासह ऑनलाइन माहिती भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ही स्पर्धा ३१ जुलैपर्यंत चालणार असून या कालावधीत सहभागी गट विविध कृषी विकासात्मक उपक्रम राबविणार आहेत. शेतकरी गटांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढविणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

तालुकानिहाय सहभागात रिसोड तालुका १४८ गटांसह अव्वल ठरला असून त्यापाठोपाठ वाशिम (१३५), मानोरा (१३१), कारंजा (१२८), मालेगाव (११५) आणि मंगरुळपीर (१११) तालुक्यांचा समावेश आहे. याचबरोबर शासनाच्या ‘खेती बचाओ अभियान’ ची अंमलबजावणीही या शेतकरी गटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मृदा आरोग्य संवर्धन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीचा प्रसार, हुमणी अळी नियंत्रण, पीक संरक्षण आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रचार-प्रसार या अभियानातून केला जाणार आहे.

Solapur News: तांबेवाडी तांड्यावर छापा टाकत ३५ टन अवैध लाकूड जप्त; १२ हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमरावतीचे कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आणि कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर यांनी प्रशिक्षणादरम्यान शेतकरी गटांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर सहभागी गटांना सातत्याने मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: Washim news enthusiastic participation by 768 farmer groups from washim district in the farmer group league competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
1

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
2

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Washim News: दिव्यांगांना थकीत मासिक मानधन लवकरच मिळणार; आ. भावना गवळी यांची जनता दरबारात माहिती
3

Washim News: दिव्यांगांना थकीत मासिक मानधन लवकरच मिळणार; आ. भावना गवळी यांची जनता दरबारात माहिती

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
4

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.