Risod ST Depot Employee Dispute
यावेळी चालक डी. पी. माळेकर यांच्यासह ते बसस्थानक परिसरात बसजवळ उपस्थित होते. रिसोड आगारातून प्रवाशांसह बस रवाना होत असताना आगार व्यवस्थापक नीलेश बोधडे हे आले. त्यावेळी त्यांनी आपल्याला निलंबित व बडतर्फ करण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच ‘तुला नीट काम करता येत नाही, एखाद्या दिवशी पाहून घेतो’, अशा शब्दांत धमकावल्याचा आरोप वाहकाने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच आगार व्यवस्थापक जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला.
यापूर्वीही आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून, भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार सय्यद जाबीर अली सय्यद अकबर यांनी रिसोड पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, एसटी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील हा वाद चर्चेचा विषय ठरत आहे.
रिसोड आगार प्रमुख, नीलेश बोदाडे म्हणाले की, सदर बसस्थानकात बस असताना गाडीची बुकिंग करण्यासाठी सांगितले असता मला बुकिंग का? करायला लावता आणि तो अधिकार माझा तो मी बघून घेईल, गाडी बुकिंग करायला लावणे हा आगार प्रशासनाने आद्य कर्तव्य असताना सदर एसटीच्या बस स्थानकामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्हिडीओ कैद आहे. सदर वाहकांमध्ये उलट पक्षी आगार प्रमुखांनाच अर्वाच्या भाषेत शिवागीळ करून मारण्याची धमकी दिली.
Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी
Ans: आगार व्यवस्थापक नीलेश बोधडे आणि एसटी वाहक सय्यद जाबीर अली सय्यद अकबर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे.
Ans: शिवीगाळ करून निलंबित आणि बडतर्फ करण्याची धमकी दिल्याचा आरोप वाहकाने केला आहे.
Ans: वाहकाने आगार प्रमुखांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.






