
कास समितीमार्फत पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमधे पाणीपुरवठा सुरू; वन्यप्राण्यांची होणार सोय
कास पठार व परिसरात विपुल निसर्ग संपदा असून, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी अशी वनसंपदा आहे. कास समितीमार्फत या परिसरात सिमेंटचे कृत्रिम पाणीसाठे बनवण्यात आले असून, दरवर्षी उन्हाळ्यात या पाणवट्यांमध्ये टँकरच्या साह्याने पाणी भरले जाते. परंतु, यावर्षी सप्टेंबरपासूनच पाऊस गायब झाल्याने रानावनातील ओढे, ओहळ, झरे आधी स्त्रोत लवकर कोरडे पडले असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी दिवाळीतच कास समितीने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत हे कृत्रिम पानवटे पाण्याने भरण्याचे काम सुरू केले आहे.
ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करता येत आहे, अशा ठिकाणी पाईपने पाणी सोडले जात आहे. तर ज्या ठिकाणी टँकर पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी कर्मचारी स्वतः बादल्या, बॅरल आदींच्या सहाय्याने स्वतः पाणी नेऊन हे पानवटी भरत आहे. हा उपक्रम वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल जावळी संतोष पाटील, वनक्षेत्रपाल सातारा संदीप जोपळे, कास समितीचे अध्यक्ष सिताराम बादापुरे, उपाध्यक्ष प्रदीप कदम, सदस्य संतोष आटाळे, ज्ञानेश्वर आखाडे, माजी अध्यक्ष दत्ता किर्दत, विजय वेंदे, सोमनाथ बुढळे व कास समितीचे कर्मचारी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमधे पाणीपुरवठा सुरू
कास परिसरात कास तलाव हा पाण्याचा मुख्य स्त्रोत असून, जंगलात ओढे, झरे आदींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होते. पठारावरी काही तलाव आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे जंगलात पाण्याची कमतरता असून, या कृत्रिम पानवट्यांचा आधार वन्य प्राण्यांना मिळणार आहे.
“यावर्षी कृत्रिम पानवट्यावर लवकर पाणी भरण्याची वेळ आली असून, या कामामुळे कास परिसरातील वन्य प्राण्यांची, पशुपक्ष्यांची पाण्याची गरज भागवली जाणार आहे. पाण्यासाठी होणारी धावपळ व मैलोनमैलाचा प्रवास थांबणार आहे.”
– ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास समिती, कुसूंबीमुरा.
१. कास परिसरातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी का भरले जात आहे?
दुष्काळी परिस्थितीमुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत लवकर आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात आहे.
२. पाणवठ्यांमध्ये पाणी कोण भरत आहे?
कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
३. कास परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोतांची स्थिती काय आहे?
सप्टेंबरपासून पाऊस कमी झाल्याने ओढे, ओहळ आणि झरे लवकर कोरडे पडले आहेत.