• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Water Wastage In Mumbai By Leakage And Theft Nrsr

पाणी गळती आणि चोरीमुळे मुंबईत हजारो लिटर पाणी वाया, पालिकेच्या नव्या धोरणामुळे मिळणार दिलासा

मुंबईची (Mumbai) तहान भागवण्यासाठी अतिरिक्त साठा वापरण्याची वेळ महापालिकेवर (BMC) येत असतानाच दुसरीकडे पाणी (Water Issue) माफियांचे चांगभलं सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी खासगी टँकर माफिया, तसेच झोपदीदादा अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी करीत असल्याची माहिती अनेकवेळा समोर आली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 11, 2022 | 08:42 PM
पाणी गळती आणि चोरीमुळे मुंबईत हजारो लिटर पाणी वाया, पालिकेच्या नव्या धोरणामुळे मिळणार दिलासा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबईकरांची (Mumbai) तहान भागवण्यासाठी प्रत्यक्षात ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा  (Water Supply) मुंबईला होत असल्याचा दावा मुंबई पालिका जल विभागाकडून(Water Department) करण्यात येतो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच सुमारे साडेआठशे ते ९०० दशलक्ष लिटर पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पालिकेच्या नव्या धोरणामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी अतिरिक्त साठा वापरण्याची वेळ महापालिकेवर येत असतानाच दुसरीकडे पाणी माफियांचे चांगभलं सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी खासगी टँकर माफिया, तसेच झोपदीदादा अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी करीत असल्याची माहिती अनेकवेळा समोर आली आहे. पाणी गळती, पाणी चोरीमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असताना हे रोखण्यासाठी आतापर्यंत पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. यावरून पालिका सभागृहात अनेकवेळा वादही रंगले आहेत. पाणी हक्क समितीने याविरोधात सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्षही वेधले आहे. मुंबईतल्या डोंगरावरील भागात पाणी टंचाई असताना पाणी चोरीचे प्रमाण अद्याप थांबलेले नाही.

[blockquote content=”मागेल त्याला पाणी, या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. गेल्या २८ नोव्हेंबर २०१६ रोजी या धोरणाची अंमलबजावणी झाली. मात्र त्यात त्रूटी होत्या. लोकांना पाणी मिळू नये यासाठी जलअभियंते प्रयत्न करीत होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रशासनाला मदत करू. मात्र अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करायला हवी. ” pic=”” name=”-सीताराम शेलार, समन्वयक, पाणी हक्क समिती”]

स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा मुंबईकरांचा अधिकार असला तरीही आजही मुंबईतील एम वॉर्डमधील ५० टक्के कुटुंबं चक्क दररोज पाणी विकत घेतात. पाण्यावर होणारा खर्च हा जवळपास अन्नधान्यांवर होणाऱ्या खर्चाइतकाच आहे. साडेसहा ते दहा हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक उत्पन्न असलेल्या या कुटुंबांच्या मिळकतीमधला मोठा हिस्सा हा पाणी विकत घेण्यावर खर्च होतो. असे गोवंडी –शिवाजी नगर, मानखुर्द मधील रहिवाशांनी सांगितले.

सामान्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन टँकर माफिया पाणी विकतात. ज्यांच्याकडे नळ आहेत त्यामध्येही कमी दाबाने पाणी येते, या नळातूनही चोरून दुसऱ्या जोडण्या दिल्या जातात. पालिका नव्या जोडण्या देत नसल्याने सामान्यांपुढे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो, हेच येथील विदारक चित्र आहे.

[read_also content=”‘रनवे 34’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज, वाढली प्रेक्षकांची उत्सुकता https://www.navarashtra.com/photos/runway-34-movie-second-trailer-released-nrsr-267611.html”]

एकीकडे पाणी माफिया तर दुसरीकडे पाणी गळतीचे प्रमाणही मोठे आहे. दीड कोटी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, असा दावा जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईला दिवसाला फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होतो. पाणी चोरी व गळती रोखण्यात जल विभाग अपयशी पडत असून वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे या गोष्टी सर्रास सुरु असतात. त्यामुळे मुंबईत पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही हे प्रमाण थांबलेले नाही.

मागेल त्याला पाणी तेही शुद्ध मिळेल. तसेच झोपडीधारकांना नळजोडणी, ओसी नसलेल्या रहिवाशांनाही समान दराने पाणी मिळणार असून येत्या १ मे पासून नवीन धोरणाची अंमल बजावणी होणार असल्याचे उपनगराचे पालक मंत्री आदित्य़ ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षाची सतावणारी ही समस्या आता दूर होणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येथे होते सर्वाधिक पाणी चोरी
यामध्ये महापालिकेच्या टँकरची संख्या सुमारे ९ हजार १८१ आहे, तर खासगी टँकरची संख्या सुमारे ३९ हजार ९९९ एवढी आहे. काही खासगी टँकरद्वारे पाण्याची लूट केली जाते.

Web Title: Water wastage in mumbai by leakage and theft nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 08:35 PM

Topics:  

  • Water supply
  • Water supply in mumbai

संबंधित बातम्या

Chandrapur News: राजुरा शहरात दुषित पाणीपुरवठा सुरु, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!
1

Chandrapur News: राजुरा शहरात दुषित पाणीपुरवठा सुरु, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हळद लागल्यानंतर नवरा-नवरीला घरातच का ठेवले जाते? काय आहे यामागचे कारण?

हळद लागल्यानंतर नवरा-नवरीला घरातच का ठेवले जाते? काय आहे यामागचे कारण?

Dec 12, 2025 | 04:15 AM
Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी

Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी

Dec 12, 2025 | 02:35 AM
जर आपली लोकशाही आहे जगात मजबूत; तर विरोधकांमध्ये का आहे फसवणुकीची कुजबूज

जर आपली लोकशाही आहे जगात मजबूत; तर विरोधकांमध्ये का आहे फसवणुकीची कुजबूज

Dec 12, 2025 | 01:15 AM
Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

Dec 12, 2025 | 12:30 AM
मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा

मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा

Dec 11, 2025 | 11:23 PM
Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

Dec 11, 2025 | 10:12 PM
Dharmendra यांचे ‘ते’ स्वप्न राहिले अपुरे! Hema Malini यांनी प्रार्थना सभेत केला खुलासा

Dharmendra यांचे ‘ते’ स्वप्न राहिले अपुरे! Hema Malini यांनी प्रार्थना सभेत केला खुलासा

Dec 11, 2025 | 09:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.