Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत जंगी स्वागत

संत सोपानकाका महाराज पालखी (Sant Sopankaka Maharaj Palkhi) सोहळ्याचे बारामती शहरात आगमन झाल्यावर पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माळेगाव येथील मुक्काम आटोपून संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामतीकडे रवाना झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 01, 2022 | 08:42 PM
संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत जंगी स्वागत
Follow Us
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत सोपानकाका महाराज पालखी (Sant Sopankaka Maharaj Palkhi) सोहळ्याचे बारामती शहरात आगमन झाल्यावर पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माळेगाव येथील मुक्काम आटोपून संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामतीकडे रवाना झाला.

पालखीचे बारामती शहरात आगमन झाल्यानंतर मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी पालखीचे स्वागत केले. तर यंदा संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचा शहरात दोन दिवस भिगवण चौक शारदा प्रांगण येथे मुक्कामी आहे. पालखी सोहळ्याने शहरात प्रवेश केल्यावर कसबा येथे भव्य स्वागत करण्यात आले. तर पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारून व फुलांची सजावट करुन व रस्त्यावर दुतर्फा रांगोळीचा सडा घालण्यात आला होता.

यंदाच्या वर्षी पालखी सोहळा दोन वर्षाने होत असल्याने वारकरी व भाविक भक्तिभावाने सामील झाले होते. टाळ, मृदुंगाचा गजर व विठु नामाने अवघा परिसर दुमदुमून निघाला होता. खांद्यावर भगव्या पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन एका रांगेत निघालेले वारकरी हे चित्र अगदी मनमोहक दिसत होते.

रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तर कसबा येथे बारामती नगर परिषद, बारामती तालुका दूध संघ, आर. जे. ग्रुप, श्री संत सावतामाळी तरुण मंडळ, अखिल कसबा युवक ग्रुपच्या वतीने पालखीत सहभागी वारकऱ्यांना अल्पोपहार, चहा, पिण्याचे पाणी व थंड पेयाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Welcome of sant sopankaka maharaj palkhi in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 08:42 PM

Topics:  

  • baramati
  • बारामती

संबंधित बातम्या

बारामतीत नामांकित डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिला रुग्णाच्या तक्रारीने खळबळ, तपासणीदरम्यान अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप
1

बारामतीत नामांकित डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिला रुग्णाच्या तक्रारीने खळबळ, तपासणीदरम्यान अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
2

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

Baramati: छत्रपती कारखान्याची ऊस दरात आघाडी; पहिली उचल ३५०१ रुपये प्रतिटन, सभासदांसह गेटकेनधारकांनाही समान दर
3

Baramati: छत्रपती कारखान्याची ऊस दरात आघाडी; पहिली उचल ३५०१ रुपये प्रतिटन, सभासदांसह गेटकेनधारकांनाही समान दर

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
4

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.