Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘या’ नंबरवर तक्रार, एका मेसेजवर सुटेल समस्या…

शहरात आणि उपनगरात अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारतात. तसेच अनेकवेळा ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक अधिक भाडे मागतात. याचपार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्‍यांकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2025 | 05:09 PM
रिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा 'या' नंबरवर तक्रार, एका मेसेजवर सुटेल समस्या... (फोटो सौजन्य-X)

रिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा 'या' नंबरवर तक्रार, एका मेसेजवर सुटेल समस्या... (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा – टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदार संघातील बांद्रा,खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी वांद्रे पूर्व भागाचे लोकप्रतिनिधी वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 दिशा सालियान प्रकरणात रामदास आठवलेंची मोठी प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले…

वांद्रे पूर्व चे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा,खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात. गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशानां रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. सध्या अंधेरी प्रादेशिक विभागासाठी ९९२०२४०२०२ हा व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रादेशिक विभाग निहाय व्हाट्सअप हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पुर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप एका आठवड्यात प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप नंबर वर करतील.

तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी. असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

चिपळूण बसस्थानकाचे काम लवकर सुरू होणार

गेली कित्येक वर्ष रखडलेले चिपळूण बसस्थानकाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल! अशा प्रकारचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. ते एस.टी.महामंडळाच्या विविध प्रश्न संदर्भात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे तसेच आमदार शेखर निकम, आमदार सुहास बाबर, आमदार राणा जगजितसिंग पाटील व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह एसटीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Nagpur Curfew Update : नागपूरकरांना दिलासा! ‘या’ भागातील संचारबंदी नियमांवर पाच दिवसांनी शिथिलता

Web Title: Whatsapp number early for complaints of auto and taxi drivers charging illegal fares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Mumbai
  • RTO
  • WhatsApp

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.