दिशा सालियान प्रकरणात रामदास आठवलेंची मोठी प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेनेचे युवा नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांचा संबध जोडला जात आहे. विधान परिषदेतही त्यावर जोरदार चर्चा झाली आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात समावेश असेल असे मला अजिबात वाटत नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणार प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे.त्यामुळे या प्रकरणात उध्दव ठाकरे यांचं सरकार असताना चर्चा झाली होती.आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचा या मध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही.परंतु दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असं मला अजिबात वाटत नाही. यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपाती होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये. असे रामदास आठवले म्हणाले.
दिशा सलियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर तिच्या वडिलांच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिका-यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.