Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve News: देवेंद्र फडणवीस नितेश राणेंचे बाप केव्हा झाले…; अंबादास दानवेंनी राणेंच्या जखमेवर मीठ चोळलं

धाराशिव – जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीवरून बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी घटक पक्षांना थेट इशारा दिला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 11, 2025 | 02:38 PM
Ambadas Danve News: देवेंद्र फडणवीस नितेश राणेंचे बाप केव्हा झाले…; अंबादास दानवेंनी राणेंच्या जखमेवर मीठ चोळलं
Follow Us
Close
Follow Us:

Ambadas Danve on Nitesh Rane: भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये आयोजित एका सभेत बोलताना नितेश राणे यांनी, “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असा दम भरला होता. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे  आहेत, तुमचा बाप कोण असा सवाल उपस्थित करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली.

नितेश राणेंच्या या वक्तव्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाराजी व्यक्त करत, अशा प्रकारचे बोलणे टाळा, असा सल्ला नितेश राणेंना दिला. पण या घडामोडींनंतर मात्र नितेश राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे आमदार, अंबादास दानवे यांनी थेट नारायण राणेंचे नाव घेत डिवचलं आहे.

National Guard In America: ट्रम्प यांनी हिंसक निदर्शने दडपण्यासाठी लॉस एंजेलिसला पाठवलेले US नॅशनल गार्ड्स किती

नितेश राणे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर अंबादास दानवे यांनी थेट नारायण राणेंचे नाव घेत राणे-पिता पुत्रांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांना नितेश राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या वादाबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, नारायण राणे हे नितेश राणे यांचे बाप आबेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मला कळलंच नाही.

नेमकं काय प्रकरण?

धाराशिव – जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीवरून बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी घटक पक्षांना थेट इशारा दिला. “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असा दम त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले, “देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, हे विसरू नका.” त्यांच्या या आक्रमक भाषेवर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बाबा सिद्धीकी हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला कॅनडात अटक; भारतात आणायची प्रक्रिया सुरू

या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा विषय चर्चेला आला. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

या आधीही  नितेश राणेंनी, “काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय…” असं विधान करत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरूनही महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण यावेळी त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत थेट महायुतीतील घटकपक्षांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांनी नितेश राणेंना समज दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाचाही ‘बाप’ काढणं योग्य नाही. मी नितेश राणेंशी बोललो. ते म्हणाले की माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुमच्या मनात काहीही अर्थ असले, तरी लोकांमध्ये जे परसेप्शन तयार होतं, त्यालाच राजकारणात महत्त्व असतं.”

 

Web Title: When did devendra fadnavis become nitesh ranes father ambadan danve rubbed salt in ranes wounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Narayan Rane
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
3

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.