Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभाग रचना करताना “आय टू आर” चा विचार करा, नानासाहेब इंदिसे यांची मागणी

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2025 | 03:30 AM
प्रभाग रचना करताना "आय टू आर" चा विचार करा, नानासाहेब इंदिसे यांची मागणी

प्रभाग रचना करताना "आय टू आर" चा विचार करा, नानासाहेब इंदिसे यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत केली. या बाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचेही इंदिसे यांनी सांगितले.

विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रभाग रचना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना सन 2017 च्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावेळेस प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील उपस्थित होते.

इंदिसे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने १० जून रोजी महाराष्ट्रातील महानगरपालिका यांच्या निवडणूका सन २०१७ च्या प्रमाणे प्रभाग रचना करणेत येईल असा अद्यादेश काढलेला आहे, तो बहुतांशी महानगरपालिकेतील जनता, मतदार, लोकप्रतिनिधी व अनुसुचित जातीच्या वर्गावर अन्याय करणारा आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भाईंदर, नवीमुंबई, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-कुपवाड इत्यादी महानगरपालिका परिक्षेत्रात नागरीकरण वाढलेले आहे. या महानगरपालिकेतील लोकसंख्या व मतदारसंख्या या १४ वर्षात दीडपटीने वाढलेली आहे.

ठाणे शहराचा विचार केल्यास, ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे पुर्वी “इंडस्ट्रीयल झोन” होते, ते आता “आर झोन” झाले आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल मालक हे बिल्डर लाईनमध्ये विकासक म्हणून काम करीत असल्यामुळे रहिवाशी संख्या दुपटीने वाढली आहे. ठाणे शहराच्या वर्तकनगर विभागात म्हाडाच्या जागेत ७० इमारती १+ ४ मजली होत्या. त्यामध्ये पूर्वी ४० कुटुंबिय राहत होते. आता त्याच ठिकाणी टाॅवर उभे राहिल्याने १०० कुटुंबे राहतात. शिवाईनगर पोखरण रोड नं.१ वसाहतसुध्दा म्हाडा व देविदयाल कंपनीत वसलेली आहे. तेथेही २० मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे. देशातील नामांकित रेमंड कंपनीत ही ४० ते ५० मजली पेक्षा जास्त अशा टोलेजंग १० इमारती उभ्या राहिल्या आहेत व उर्वरित जागेत बांधकाम चालु आहे. त्याचप्रमाणे पोखरण रोड नं. २ ठाणे मधील वसंतविहार, पवारनगर, गांधीनगर, सुभाषनगर, सिध्दांचल या सर्व ठिकाणी औद्योगिक वसाहतींवर निवासी बांधकामे होत आहेत.

उपवन रोड, घोडबंदर रोड, कोलशेत, बाळकुम, ब्रम्हांड, हिरानंदानी, वागळे इस्टेट परिसर या ठिकाणी टोलेजंग इमारती तयार झालेल्या आहेत. प्रामुख्याने लहान छोट्याशा दिवा गावाचीही लोकसंख्या सुमारे ४ ते ५ लाखापर्यंत झाली आहे. त्यामुळेच ठाणे महानरपालिका परिक्षेत्राची लोकवस्ती सन २०११ च्या शिरगणतीच्या दुपट्टीने वाढलेली आहे. सर्वसाधारण लोकसंख्येप्रमाणेच अनुसुचित जातीची लोकसंख्या वाढलेली आहे. पूर्वी ठाणे महानगरपालिकेत सात अनुसुचित जातीचे नगरसेवक होते वाढत्या लोकसंख्येनुसार ते नगरसेवक अनुसूचित जातीच्या नगरसेवकांची संख्या १०च्या पुढे असणे आवश्यक आहे. सन २०१७ प्रमाणे प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय जनता, मतदार, लोकप्रतिनिधीसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अथवा मध्यम कायदेशीर पर्याय शोधावा व संबंधित जनतेला, मतदारांना, लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा, अशी मागणी आपण केली असल्याचे नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले.

Web Title: While designing the ward structure consider the i to r approach according to the instructions of nanasaheb indise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 03:30 AM

Topics:  

  • maharashra
  • thane

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रातील ‘एन्ट्री’चे ठरणार भवितव्य, १० हजारांपेक्षा जास्त उमेदवार देणार टीईटी परीक्षा
1

शिक्षण क्षेत्रातील ‘एन्ट्री’चे ठरणार भवितव्य, १० हजारांपेक्षा जास्त उमेदवार देणार टीईटी परीक्षा

महाराष्ट्राच्या या हिल स्टेशनला ‘इटली’ म्हटले जाते, पण का? सुंदरता पाहून पर्यटक होतात आकर्षित
2

महाराष्ट्राच्या या हिल स्टेशनला ‘इटली’ म्हटले जाते, पण का? सुंदरता पाहून पर्यटक होतात आकर्षित

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
3

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
4

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.