हॉटेलमधील राड्यानंतरही हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच कारमधून का गेले? हितेंद्र ठाकूर यांनी संगळंच सांगून टाकलं
विरारच्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना रोखून धरलं होतं. यावेळी हॉटेलमध्ये बराच राडा झाला. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले होते. आमदार क्षितीज ठाकूर हे ही घटनास्थळी होते. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावर पैसेही फेकले. दरम्यान, विनोद तावडे मुंबईच्या दिशेने जाताना हितेंद्र ठाकूर यांच्या कारमधून गेले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी यावर खुलासा केला आहे.
विनोद तावडे यांच्यासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विरारमधील हॉटेलमध्ये आज मोठा राडा झाला. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तब्बल ६ तास चाललेल्या या राड्यानंतर विनोद तावडे त्यांच्या कारमध्ये जाऊन बसले. मात्र लगेचच ते गाडीतून उतरले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या कारमध्ये जाऊन बसले. या कारमध्ये हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूरही उपस्थित होते. यावर हितेंद्र ठाकूर म्हणाले, “आम्ही जेवायला जातोय. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलतो.. उरलेले पैसे ते मला देतील. आम्ही मित्र आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
विनोद तावडेंची कार खराब झाला आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढा, असं पोलिसांनी सांगितलं. ती जबाबदारीही त्यांनी माझ्यावरच टाकली. मी माणुसकी म्हणून तेही केलं. त्यांना दुसरी गाडी दिली आणि त्यांना मुंबईत पाठवलं. पार्टी विथ डिफरंन्स म्हणणारे पैसे वाटतात. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सचिव मुंबईत येतात, याचं आश्चर्य वाटतं. महिलांनाही त्यांनी पुढे केलं. तिथे महिला देखिल तोंड लपवून बसल्या होत्या. महिलांच्या माध्यमातून पैसे वाटले तर नाहीत ना संशय येत नाही. १९ ते २० लाख पैसे वाटण्यात आले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानेच मला हे सांगितलं होतं. बाटेंगे तो पिटेंग. मग आम्हीही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विरारमधील हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?
विरार पूर्वच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैशांची बॅग घेऊन गेल्याचा आणि पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. त्यांना तब्बल ६ तास अडवून ठेवलं. त्यांच्या अंगावर पैसे फेकले. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. यावेळी विनोद तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार सुरू होता. बविआच्या आरोपाचं विनोद तावडे यांनी खंडन करत आम्ही पैसे वाटले नाहीत, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान भाजपने आरोप फेटाळून लावले असले तरी मतदानाच्या काही तास आधी घडलेल्या या प्रकारामुळे राज्यात खळबळ माजली आहे.