Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांच्या पाणवठ्यांवर लाखोंचा खर्च! अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठा कोरडा; चौकशीची मागणी

Wildlife Waterholes: अजनाळे-लिगाडेवाडी परिसरात तब्बल ३१२ हेक्टर वनक्षेत्र असून या भागात काळवीट, कोल्हे, लांडगे, मोर, ससे यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर आहे. या वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी लाखो रुपये खर्चुन पाणवठा तयार करण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 02:45 PM
Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांच्या पाणवठ्यांवर लाखोंचा खर्च! अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठा कोरडा; चौकशीची मागणी

Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांच्या पाणवठ्यांवर लाखोंचा खर्च! अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठा कोरडा; चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:

Wildlife Waterholes: वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून पाणवठे उभारले जातात; मात्र प्रत्यक्षात त्याच पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याचे चित्र सांगोला तालुक्यातील अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रात समोर आले आहे. वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली होणाऱ्या खर्चाचे वास्तव या कोरड्या पाणवठ्यामुळे उघड झाले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

टँकरच्या फेऱ्या, बिलांची तपासणी करा

वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात असेल, तर त्याचा प्रत्यक्ष विनियोग झाला आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. टँकरच्या फेऱ्यांची नोंद, वाहनांचे लॉगबुक, पाणीपुरवठ्याच्या पावत्या आणि प्रत्यक्ष खर्च यांची पडताळणी करावी. पाणवठा कोरडा असताना टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे दाखवून बिले काढली आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अजनाळे-लिगाडेवाडी वनक्षेत्रातील पाणवठ्याची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. पाणवठ्याच्या निर्मितीपासून झालेल्या खर्चाची आणि पाणीपुरवठ्याच्या नोंदींची स्वतंत्र चौकशी करावी. अनियमितता आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

वनपाल-वनरक्षक नेमके करतात काय?

वनक्षेत्रातील झाडांची सुरक्षा, वन्यप्राण्यांचे संरक्षण, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणि पाणवठ्यांची देखभाल ही वनविभागाची जबाबदारी आहे. मात्र, वनपाल आणि वनरक्षक गावाकडे तसेच वनक्षेत्रात नियमित फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वनक्षेत्रात पाहणी करतात का? त्यांच्या गस्तीच्या नोंदी काय आहेत? वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था कोण पाहणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून सांगोला तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याची चर्चा आहे.

अजनाळे-लिगाडेवाडी परिसरात तब्बल ३१२ हेक्टर वनक्षेत्र असून या भागात काळवीट, कोल्हे, लांडगे, मोर, ससे यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर आहे. या वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी लाखो रुपये खर्चुन पाणवठा तयार करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणवठा तयार झाल्यापासून त्यामध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. प्रत्यक्ष छायाचित्रातही पाणवठा कोरडा असल्याचे दिसत आहे.

Navi Mumbai News: आधुनिक नवी मुंबईत संस्कृतीचा वारसा कायम; तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा

वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही वनविभागाची जबाबदारी असताना पाणवठा उभारून त्यात पाणीच नसेल, तर या कामाचा उपयोग काय? केवळ बांधकाम करून वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी संपते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. विशेषतः पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, तर लाखो रुपयांचा खर्च नेमका कोणत्या कामासाठी केला जात आहे, याचे स्पष्टीकरण वनविभागाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Wildlife waterholes lakhs spent on waterholes for wild animals waterhole in the ajnale ligadewadi forest area found dry sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Solapur
  • Tree
  • Wild Animals

संबंधित बातम्या

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना
1

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
2

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.