
Ladki Bahin Yojna:
लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.
पिंपरीत भाजपची ताकद आणखी वाढणार; माजी नगरसेवक राहुल कलाटे आज करणार भाजपमध्ये प्रवेश
मात्र अजूनही ३० ते ४० लाख महिलांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने ई केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिल्याची माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत E-KYC करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सद्या राज्यभरातील २ कोटी ४७ लाख महिला या योजनेचा लाभ घेतल आहेत. गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये या योजनेची सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.
Vijay Hazare Trophy : सुर्या आणि दुबे खेळणार मुंबईसाठी, इशान किशन करणार झारखंडचे नेतृत्व!
जर तुम्ही अद्याप लाडकी बहिन योजनेसाठी तुमचा eKYC पूर्ण केला नसेल, तर आम्ही तुम्हाला अंतिम मुदत वाढण्याची वाट पाहू नका. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पूर्ण करता येते. याव्यतिरिक्त, तुम्ही अंगणवाडी सेविकेला भेट देऊन देखील तुमचा eKYC पूर्ण करू शकता. मोबाइल eKYC साठी, तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc/ पूर्ण करू शकता.
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हावार आढावा सध्या सुरू असून, दररोज ई-केवायसी प्रक्रियेची स्थिती तपासली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मोठ्या संख्येने पात्र महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करू न शकल्यास अंतिम मुदत वाढवण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. डिसेंबर महिना संपत असताना निधी कधी जमा होणार, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही महिन्यांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जाईल, असे सांगितले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.