Photo Credit : Team Navrashtra
मुंबई : येत्या १२ जुलैला विधानपरिषद निवडणुका होणार आहे. या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू आहे. आपले उमेदवार निवडून आणण्याठी महायुती मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती समोर आली आहे.विधानपरिषद निवडणूक जिंकण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देण्यात आली आहे. अशातच, महायुती कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
२०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत जे धक्कातंत्र वापरण्यात आले होते तसेच धक्कातंत्र महायुतीची पुन्हा एकदा वापरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती आहे. अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे तीन- चार आणि ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळाला लावण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात महायुतीचे 9 उमेदवार आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत या नऊ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यात आली आल्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे १२ जुलैला होणाऱ्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.