Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकास अधिकारी मिळेल का?, ‘पीडीसीसी’च्या खातेदार शेतकऱ्यांचा सवाल; कर्ज प्रकरणे रखडली

संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण (ता. इंदापूर) येथील शाखेला विकास अधिकारी मिळेल का?, अशा प्रकारची विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2023 | 08:55 AM
विकास अधिकारी मिळेल का?, ‘पीडीसीसी’च्या खातेदार शेतकऱ्यांचा सवाल; कर्ज प्रकरणे रखडली
Follow Us
Close
Follow Us:

भिगवण : संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण (ता. इंदापूर) येथील शाखेला विकास अधिकारी मिळेल का?, अशा प्रकारची विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भिगवण शाखेला कायमस्वरूपी विकास अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज, तसेच मध्यम मुदत, पाईपलाईन, अवजारे अशा प्रकारचे कर्ज मिळण्यासाठी विलंब होत आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराच्या फासातून सुटण्यासाठी केलेली धडपड वाया जात आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने पुन्हा सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.

याबाबत सविस्तर मिहीती अशी की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण शाखेतील विकास अधिकारी टी. टी. वाबळे यांचा गेल्या तीन महिन्यांपूर्वी अपघात झाल्यामुळे ते रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर विकास अधिकारी नंदकुमार गायकवाड यांची भिगवण शाखेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, नंदकुमार गायकवाड यांना शेटफळगढे( ता. इंदापूर) अकोले( ता. इंदापूर) व भिगवण( ता. इंदापूर) अशा तीन गावातील जिल्हा मध्यवर्ती शाखेचा कारभार पाहण्याची जबाबदारी असल्यामुळे आठवड्यातून दोनच दिवस ते भिगवण शाखेसाठी उपलब्ध होत आहेत. परिणामी वेळेत भिगवण शाखेचा कारभार करण्यासाठी कालावधी कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांना कर्ज वितरण करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

[blockquote content=”माझ्याकडे तीन शाखेचा कारभार असल्यामुळे मी शक्य होईल तेवढे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याची व्यवस्था करीत आहे. डिसेंबर महिना अखेर भिगवण शाखेत तब्बल ६५ शेतकऱ्यांना मी पीक कर्ज वितरण केले आहे. माझ्याकडून कुठल्याही शेतकऱ्यांची आडवणूक होत नाही. तरीसुद्धा शाखेचे कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येक शाखेला स्वतंत्र विकास अधिकारी असणे आवश्यक असून हा निर्णय विभागीय अधिकारी यांच्याकडे आहे.” pic=”” name=”- नंदकुमार गायकवाड, विकास अधिकारी, पीडीसीसी बँक. “]

[blockquote content=”जिल्हा बँकेच्या भिगवण शाखेला विकास अधिकारी नेमणूक करणे बाबत विलंब झाला आहे परंतु एवढ्या आठवड्यात विकास अधिकारी ची नेमणूक करून शेतकऱ्याची होणारी अडचण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” pic=”” name=”- ए. बी. थोरात, विभागीय अधिकारी, पीडीसीसी.”]

Web Title: Will we get a development officer the question of farmers who are account holders of pdcc the loan cases are stalled nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2023 | 08:53 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Bhigwan
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
1

Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
2

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
3

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
4

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.